vaccination and covid test sakal
नांदेड

नांदेड : कोरोना चाचणीसह लसीकरणही वाढले

तरुणाईची गर्दी वाढली; दिवसाला हजारहून अधिक संशयितांचे स्वॅब

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचा वेग मंदावला होता. दिवसाला कधी तीनशे, पाचशे तर कधी आठशेच्या जवळपास स्वॅब तपासले जात होते. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या देखील कमी दिसत होती. मात्र, राज्यभरात कोरोना व ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने जिल्ह्यातील मंदावलेल्या कोरोना चाचण्यांचा वेग आणि लसीकरणाने पुन्हा जोर धरला आहे.(Vaccination also increased with corona testing)

जिल्ह्यात कोरोना पहिला रुग्ण आढळल्यापासून बुधवारपर्यंत (ता. पाच जानेवारी) जिल्हाभरातील आठ लाख एक हजार १२४ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी सहा लाख ९६ हजार ८८७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर आत्तापर्यंत ९० हजार ६४६ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. त्यापैकी ८७ हजार ८८८ जणांवर उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले. दोन हजार ६५५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.(Nanded news)

डिसेंबर अखेरपर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या एक लाख ८७ हजार ५३१ तर शहरी भागात ४३ हजार ९३०, महापालीका क्षेत्रात ४० हजार ५२९ झाली आहे. एक डोस घेतलेल्या नागरीकांची ग्रामीण भागातील संख्या चार लाख ३० हजार १६७, शहरी भागातील एक लाख १२ हजार ६१५ तर महापालीका क्षेत्रात एक लाख ६४ हजार ९५० इतकी आहे. एक डोस घेतलेल्यांची एकत्रीत संख्या सात लाख सात हजार ७३२ तर दोन डोसपूर्ण झालेल्यांची एकत्रित संख्या दोन लाख ७१ हजार ९९० इतकी झाली आहे. आरोग्य विभागापुढे ६० टक्के नागरिकांचे लसीकरण करण्याचे आव्हान आहे. त्यासाठी आरोग्य विभागास सर्वांचे तातडीने लसीकरण करणे व संशयीत व्यक्तींचे जास्तीत जास्त प्रमाणात स्वॅब तपासणीसाठी घेणे, महत्वाचे आहे.

मंगळवारी १५ ते १८ वयोगटात झालेले लसीकरण

  • ग्रामीण भाग - नऊ हजार ५६५

  • नगरपालिका क्षेत्र - एक हजार ६९५

  • महापालिका क्षेत्र - सहा हजार २००

  • एकुण लसीकरण - १७ हजार ४६०

(तरुण - तरुणींनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Air Pollution : दिल्लीतील वायू प्रदूषण कोरोनापेक्षाही घातक, 'या' लोकांना ताबडतोब शहर सोडण्याचा सल्ला

राहुरी तालुक्यातील धक्कादायक घटना! 'जमिनीच्या आमिषाने महिलेवर अत्याचार';खोटे मृत्युपत्र तयार करुन जमीन बळकावली..

Latest Marathi News Live Update : ..अखेर प्रशासनाला आली जाग; कारखानदार-संघटनांची आज महत्त्वाची बैठक

Daily horoscope: आजचे राशिभविष्य-३ नाेव्हेंबर २०२५

महिला वर्ल्ड कपच्या ५२ वर्षांच्या इतिहासात कुणाला जमलं नव्हतं, दीप्तीने केला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT