01
01 
नांदेड

Video : बेभान ! नांदेडकर कधी येणार भानावर ?

राजन मंगरुळकर

नांदेड ः नाही नाही म्हणता एक महिन्याने नांदेडला ‘कोरोना’चा एक रुग्ण सापडला अन् आता चक्क रूग्ण संख्या दहा दिवसांत २४ वर पोहोचली. या प्रकाराने प्रशासन हादरले मात्र नागरिक भानावर आले नाही. ‘सोशल डिस्टंन्सिंग’ पायदळी तुडवत प्रत्येक जण बाजारात गर्दी करीत आहे. गर्दीत कोणी संशयित रूग्ण आहे का याचे भान न ठेवता बेभान झालेली गर्दी कधी भानावर येईल, असा प्रश्न निर्माण होत आहे. शहरातील जुना मोंढा भुसार बाजारासह मालटेकडी येथील फळांच्या बाजारात ‘कोरोना’चा फैलाव होईल, अशीच स्थिती होत असल्याचे गर्दीवरून दिसून येत आहे.

नांदेडमध्ये जुना मोंढा भुसार बाजारासह मालटेकडी येथील फळांच्या बाजारात कोरोनाचा फैलाव होईल अशीच स्थिती आहे. देशभरातील फळांच्या गाड्या माळटेकडी भागातील होलसेल बाजारात येत असतात. इथून नांदेड शहर आणि जिल्ह्यात सर्व प्रकारच्या फळांचा पुरवठा होतो. याच फळांच्या होलसेल बाजारात ‘कोरोना’चा फैलाव होऊ नये यासाठी कोणतीही काळजी घेतल्या जात नाहीये. हजारो फळ विक्रेते इथे कुठल्याही सुरक्षेविना मुक्तपणे वावरत आहेत. 

महापालिकेचे सोयीस्करपणे दुर्लक्ष
मास्क, सॅनिटायझरचा इथे लवलेश देखील नाहीये. त्यामुळे इथल्या फळांतून संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे महापालिकेने या बाजारात सुरक्षा ठेवत नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करायला हवी होती. मात्र, त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आलेय. जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली नागरिकांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे. अश्या स्थितीत कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराचा फैलाव झाला तर त्याला कोण जवाबदार असेल असा सवाल उपस्थित झालाय.

कॅनॉल रोड परिसरातही अशीच स्थिती
शहरातील वाढता विस्तार पाहता कॅनॉल रोड परिसरात छत्रपती चौकाच्या भागातील नागरिकांसाठी दररोज सकाळी सात ते दहापर्यंत डी-मार्टच्या रस्त्यावर भाजीपाला, फळविक्रेते विक्रीसाठी बसत आहेत. याठिकाणी सुध्दा अशीच स्थिती पहावयास मिळते. नागरिक स्वतः आणि विक्रेते हे दोघेही ‘सोशल डिस्टंन्सिंग’  पाळत नसल्याचे दिसून येते. 

गल्लीबोळात किरकोळ दुकाने, भाजीविक्रेते ठाण मांडून 
शहरातील विविध भागातील गल्लीबोळात सकाळी अकरानंतर जर दुकाने बंदचे आदेश देण्यात आले आहेत तर त्याचे पालनसुध्दा होणे तितकेच गरजेचे आहे. मात्र, गल्लीबोळात किरकोळ दुकाने, भाजीविक्रेते ठाण मांडून दिवसभर बसत आहेत. नागरिकसुध्दा भाजी, फळ, आंबे, अंडी आणि इतर साहित्य जागोजागी मिळत असल्याने फेरफटका मारण्यास धजावत आहेत.

महापालिकेने घ्यावा ‘ॲक्शन मोड’
शहराच्या मुख्य बाजारासह विविध ठिकाणी आता सापडत असलेल्या रुग्णांच्या वाढत्या संख्येवरुन आता केवळ कागदी घोडे नाचविण्यापेक्षा ‘ॲक्शन मोड’ची गरज आहे. यासाठी महापालिकेने आता कृति करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT