file photo 
नांदेड

व्हिडिओ : नांदेडची रेड झोनकडे वाटचाल, तरीही रस्त्यावरील गर्दी हाटेना

अभय कुळकजाईकर

नांदेड - नांदेड शहरात आत्तापर्यंत कोरोनाचे ३१ रुग्ण सापडले असून त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे लॉकडाउन असल्यामुळे प्रशासनाने घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. तरी देखील अनेकजण भर दुपारी देखील रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे नांदेडकरांनो आता तरी शहाणे व्हा आणि फिरणे टाळून आपआपल्या घरी बसा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

लॉकडाउनच्या पहिल्या टप्यात कोरोनाचा एकही रुग्ण नांदेडमध्ये आढळून आला नाही पण दुसऱ्या टप्याच्या शेवटी एक एक करत रुग्ण सापडत गेले आणि त्याची संख्या ३१ वर जाऊन पोहचली. त्याचबरोबर तिघांचा मृत्यूही झाला. त्यामुळे प्रशासनानाच्या वतीने देखील विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. 

नांदेडकरांनो काळजी घ्या
कोरोनामुळे जगभरात हाहाकार उडाला असून तो आपण सर्वजण प्रसारमाध्यमातून आणि सोशल मीडियातून पाहत आहोत. लाखोंच्या संख्येने लोक कोरोनाबाधित झाले आहेत तर जवळपास दोन लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अजूनही कोरोनावर औषध किंवा लस सापडली नाही. तरी देखील काही महाभाग अजूनही त्यातून शहाणे झाले नाहीत. त्यामुळे आता काळजी घ्या नाहीतर मराल...असेच म्हणण्याची वेळ आली आहे. 

प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा
कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनासह पोलिस, आरोग्य विभाग, महापालिका यांच्याकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याची अंमलबजावणीही सुरु आहे. प्रशासनाने दिलेल्‍या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, वारंवार हात स्वच्छ धुवावेत, मास्क किंवा स्वच्छ धुतलेल्या रुमालाचा वापर करावा आणि अत्‍यंत आवश्‍यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडु नये, घरातच राहून कोरोना विरुद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

रस्त्यावर येण्याचा धोका पत्करु नका
प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केले तर निच्शितच आपण सर्वजण कोरोनापासून मुक्त राहू. त्यासाठी घरातच बसणे सध्या सर्वात चांगले औषध आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि घरातच बसा. रस्त्यावर येण्याचा धोका पत्करु नका. सोमवारी दुपारी नांदेड शहरात भर दुपारी तीनच्या सुमारास अनेकजण वाहनाद्वारे रस्त्यावर आल्याचे चित्र बघायला मिळाले. त्यामुळे त्याचा व्हिडिओ तयार करुन सर्वांना नजरेसमोर आणून देत आहोत. आपली काळजी आपण स्वतः घ्या आणि धोका पत्करु नका. घराबाहेर पडाल आणि रस्त्यावर याल तर परत घरी जाताना तुमच्यासोबत कोरोना येऊ शकतो, हे लक्षात ठेवा आणि आपआपल्या घरी सुरक्षित रहा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yermala Crime : सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर चालत्या ट्रकची ताडपत्री फाडून, लुटणाऱ्या सहा चोरट्याना अटक

Explained: भारतातील महिलांसाठी हृदय निरोगी राखण्याचा मार्ग – अँजाइनाबाबत सर्व महत्त्वाची माहिती

Latest Marathi News Updates Live: बीडमध्ये हुंडाबळी प्रकरणात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल

Cotton Import : कापूस आयात धोरण: जळगावच्या शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार?

Basmat News : वसमत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची पकड मजबूत, अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT