File Photo 
नांदेड

Video: ‘कोरोना’मुळे अख्खे जग नाचतंय आॅनलाईनच्या तालावर, कसं? ते वाचाच

शिवचरण वावळे

नांदेड :‘लॉकडाउन’मुळे नोकरी जाईल अशी अनेकांना भीती वाटणे स्वाभाविकच आहे. परंतु ‘कोरोना’नंतरच्या जगात वावरणाऱ्यांनी नोकरी जाईल अशी भीती न बाळगता प्रत्येकाने सकारात्मक उर्जा घेऊन ‘कोरोना’वर मात केली पाहिजे. बदलललेल्या जगात मुसंडी मारली पाहिजे, असे मत श्री गुरु गोविंदसिंघजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. यशवंत जोशी यांनी व्यक्त केले.

लॉकडाउनच्या काळात अनेक शासकीय कार्यालयातील कामे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु आहेत. दरम्यान एरवी आॅफीसमध्ये बसून होणारी बहुतेक कामे अगदी कमीत कमी मनुष्यबळाच्या जोरावर घर बसल्याने पूर्ण होत आहेत. त्यामुळे अनेक कंपनीच्या मालकास ‘वर्क फ्रॉम होम’ची सवय लागणे स्वाभाविक आहे. त्यामुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांना व नोकरदार वर्गांना वाटत असलेली भीती स्वाभाविक असली तरी, सर्वच कामे घरी बसून करणे शक्य नाही.

नवनवीन कल्पना शक्तीचा शोध घ्यावा

इंजिनिअरिंग विभागातील काही कामे ही कंपनीत जाऊन करावी लागतात. त्यासाठी मनुष्यबळाची तितकीच गरज लागणार आहे. ती गरज घरुन पूर्ण करता येणार नाही. ग्लोबलायझेशनमुळे विदेशी वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार टाकणे शक्य नाही. परंतु त्या दर्जाचे उत्पादन करण्याची व त्या वस्तूला देशातच नव्हे तर विदेशी बाजारपेठेत घेऊन जाण्यासाठी आपल्याकडे नाविन्यपूर्ण कल्पनांचा शक्तींचा आविष्कार असणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आत्तापासून नवनवीन कल्पना शक्तीचा शोध घेणे गरजेचे आहे. 

नोकरीसाठी संधी निर्माण होतील

‘लॉकडाउन’च्या काळात जगभरातील अनेक नामवंत विद्यापीठांनी हजारो कोर्स आॅनलाईन डिझाइन करुन ते सर्वांसाठी खुले केले आहेत. या आॅनलाईन कोर्सचा भारतीय विद्यार्थ्यांनी फायदा घेऊन अभ्यासक्रमाशी संबंधीत आणि जॉब ओरिएन्टेड आॅनलाईन कोर्स करण्यावर भर दिला पाहिजे. त्यातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व नोकरीसाठी देखील मोठ्या संधी निर्माण होतील. 

स्वतःला सिद्ध करा
‘‘ज्या विद्यार्थ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी आॅनलाईन काम करण्यास सुरुवात केली नसेल त्यांच्यासाठी अजूनही संधी गेलेली नाही. त्यांनी भविष्यातील काळाची पावले ओळखुन ‘कोरोना’नंतरच्या जगात स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  
- प्रा. डॉ. यशवंत जोशी संचालक एसजीजीएस इंजिनिअरिंग महाविद्यालय    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT