फोटो
फोटो 
नांदेड

नांदेडमध्ये काय चाललंय ?- वाळूसोबत आता माती माफिया सक्रीय 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात वाळू माफिया प्रशासनाच्या नाकावर टिच्चुन अवैध मार्गाने प्रचंड वाळू उपसा करत आहे. आता त्यांच्यासोबत माती माफिया गोदावरी नदी काठची सुपीक मातीसुद्धा लंपास करीत आहेत. हे माफिया आता सक्रीय झाल्याने त्यांना कोण पाठीशी घालत आहे असा प्रश्‍न पर्यावरण प्रेमीतून विचारला जात आहे. 

नांदेड शहराची ओळख ही पवित्र गोदावरी नदीमुळे आहे. गोदावरीच्या नाभीस्थळी वसलेल्या नांदेड शहरातून गोदावरी नदी वाहते. ती पुढे बंगालच्या उपसागरास मिळते. मात्र या नदीचे जिल्ह्यात वाळू माफिया व माती माफिया ओरबडून काढत आहेत. वाळूचे ढिगारे एखाद्या पर्वतासारखे जागोजागी नदी परिसरात दिसत असतांना त्या वाळूची जप्त का होत नाही असा प्रश्‍न उपस्थित केल्या जात आहे. मागील काही वर्षापासून वाळू घाटाचे लिलाव झाले नसतानाही हजारो ब्रास वाळू यंत्राच्या साह्याने रात्रभर उपसल्या जाते. 

महसुलच्या कारवाया मी करतो मारल्यासारखे, तु कर रडण्यासारखे

महसुल प्रशासनाच्या तुघलकी कारावायाचा वाळू माफियांना काहीच फरक पडत नाही. अनेक ठिकाणी तर वाळू वाहतुक करणारे वाहन सोडल्या जेत आणि वाळू तेवढी जप्त दाखविल्या जाते. 
नांदेड तालुक्यात आता आता येळी, मारतळा, सोनखेड (ता. लोहा), वासरी, वाजेगाव, पुणेगाव, नाळेश्‍वर, रहाटी (ता. नांदेड) आदी परिसरातून मातीचे उत्खनन होत आहे. माती माफिया सक्रीय झाल्याने महसुल प्रशासनासोबतच पोलिस प्रशासन या गौण खनिजाच्या वाहतुकीकडे दुर्लक्ष करतात.  
कोरोनाच्या या साथीमुळे सर्व नागरिक आपल्या घरात आहेत.

वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज 

प्रशासनाचे अधिकारी व पोलिस यंत्रणा बंदोबस्तात लागल्याने गौण खनिज वाहतुक करणारे माफिया सक्रीय झाले. महसुल प्रशासनाचे त्या- त्या भागाचे तलाठी, मंडळ अधिकारी आणि पोलिस विभागाचे बीट हवालदार तर सोनखेड पोलिस ठाण्याचे डीबी पथकातील कर्मचारी थेट वाळू व माती घाटावर जावून वसुली करतात अशा तक्रारी वरिष्ठांपर्यंत येत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन आणि पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी याकडे लक्ष घालावे व पर्यावरण आणि दुषीत होणारे नदीचे पात्र अबाधीत ठेवावे अशी मागणी करण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT