File Photo 
नांदेड

Video : छायाचित्रकारांच्या चेहऱ्यावर कधी येणार स्माईल... 

शिवचरण वावळे

नांदेड : जिल्ह्यापासून चार तासाच्या अंतरावर असलेल्या आंध्रप्रदेशातून खऱ्या अर्थाने लग्न समारंभासाठी छायाचित्रण, व्हिडीओग्राफी अशा नवनवीन संकल्पना रुजतात. मुबलक पाणी आणि सुबक शेतीमुळे जिल्हा अर्थिक संपन्न म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आनंदाच्या सोहळ्यावर खर्च करणाऱ्या शौकिन ग्राहकांची संख्या कमी नाही.

या नेमकेपणाचा जिल्ह्यातील छायाचित्रकारांनी फायदा घेत फोटोग्राफी क्षेत्रात कोट्यवधींची गुंतवणूक करुन ठेवली आहे. सध्याच्या कोरोनामुळे लॉकडाउन सुरु असल्याने व्यवसाय ठप्प पडले आहेत. यामुळे इतरांना स्माइल प्लिज म्हणण्याएवजी आता स्वतःची स्माइल हरवली आहे. बँकेचे लोन, घरखर्च चालवणे छायाचित्रकारांसाठी अवघड होऊन बसल्याची व्यथा रामकृष्ण सुर्वे यांनी ‘ई-सकाळ’कडे व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केली.

लग्नसराई पाठोपाठ आता राजकीय पुढाऱ्यांना देखील डिजीटल प्रचाराची गरज भासू लागल्याने एलईडी वॉल, हाय डेफिनेशन कॅमऱ्यांच्या मदतीने शॉर्टफिल्म तयार करुन त्याचा प्रचार, प्रसार करण्यासाठी लाखो रुपये खर्च केला जात असल्याने या व्यवसायात मोठी गुंतवणूक केली गेली आहे. निवडणूका, लग्न, वाढदिवस यातून छायाचित्रकारांना चांगले उत्पन्न मिळत असल्याने अनेकांनी अत्याधूनिक कॅमेरे, लेन्स, सॉफ्टवेअर, जिम्मी क्रेन, ड्रोन कॅमरा व त्याद्वारे एरिअल फोटोग्राफीसाठी लागणारे अत्याधुनिक साहित्य खरेदीवर भविष्यकालीन गुंतवणूक केली आहे.  

छायाचित्र व्यवसायात अनेकजण उतरले आहेत. डीजिटलायझेशन आल्यापासून मागील दहावर्षात कात टाकली आहे. अगदी गाव खेड्यातील अनके तरुणांनी शेती व्यवसायाकडे पाठ फिरवत बँक, फायनान्सचे कर्ज घेऊन छायाचित्रण व्यवसायाची कास धरली आहे. आजघडीला जिल्ह्यातील छायाचित्रकारांची संख्या अडीच हजारांपेक्षा अधिक आहे. तर त्यांना सहायक म्हणून काम करणाऱ्या तरुणांचीदेखील कमी नाही. परंतु, अचानक ओढवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे मागील दीड महिण्यापासून संपूर्ण देश लॉकडाउन आहे. त्यामुळे सर्वांचे व्यवसाय ठप्प आहेत. 

छायाचित्रण व्यवसायाशी निगडीत असलेल्या फोटो लॅब, लॅमिनेशन, अल्बम डिझाईन, व्हिडीओ एडिटींग यांच्या व्यवसायावर देखील बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. समांतर अंतराच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी घरगुती समारंभासाठी वीस व्यक्तींनाच एकत्र येण्याची मुभा असल्याने त्यात फोटोग्राफरला काम मिळलेच असे नाही. सध्या ऐन लग्नसराईत कोरोनामुळे लॉकडाउनचे संकट ओढवल्याने लग्नसराईवर पाणी फिरले आहे.

तसे छायाचित्रकारांच्या रोजी रोटीवर देखील पाणी फिरले आहे. मोडुन पडलेल्या या व्यवसायाला सावरण्यासाठी शासन तसेच संस्था, संघटनांच्या मदतीची खरी गरज आहे. त्या शिवाय छायाचित्रकार या भिषण संकटातून बाहेर पडणे शक्य नाही. शासनाकडून काहीतरी ठोस अर्थिक मदत होणे गरजेचे आहे. अन्यथा इतरांना स्माइल प्लिज म्हणणाऱ्या छायाचित्रकारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येईल, असे अनुभवी छायाचित्रकार रामकृष्ण सुर्वे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT