नांदेड क्राईम न्यूज
नांदेड क्राईम न्यूज 
नांदेड

सोलापूरच्या महिलेला नांदेडचे लग्न पडले पावणेदोन लाखाला; वाचून व्हाल थक्क

प्रल्हाद कांबळे

नांदेड : नातेवाईकांना बोलत असताना कारमधील पावणेदोन लाख रुपयाच्या मुद्देमालाची पर्स अज्ञात चोरट्यानी लंपास केली. ही घटना छत्रपती चौक परिसरात असलेल्या हाॅटेल ग्रॅंड मराठा येथे ता. १९ जूनच्या रात्री ११ च्या सुमारास घडली. याप्रकरणी सोमवारी (ता. २१) रात्री भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील एक महिला एका लग्नसमारंभासाठी नांदेडला आली होती. नातेवाइकांना बोलत थांबली असता तिच्या कारमध्ये पावणे दोन लाख रुपये मुद्देमाल असलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना 19 जून च्या रात्री घडली होती.

हेही वाचा - ई-हायवेचा पहिला प्रोजेक्ट 2022 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे

अर्धापूर तालुक्यातील पारडी मक्ता येथील अक्षय सूर्यकांत पत्रे यांची बहीण अश्विनी बिडवे राहणार बार्शी ही अक्षय पत्रे याच्या मित्राच्या लग्नासाठी आली होती. हॉटेल ग्रँड मराठा येथे थांबली असता व नातेवाईकांना हॉटेल समोर बोलत असताना कारमध्ये ठेवलेली अश्विनी हिची विटकरी रंगाची पर्स यामध्ये पाच तोळे सोन्याचे गंठण (एक लाख ७५ हजार ) रुपयाचे व नगदी बाराशे रुपये असा एक लाख ७६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल असलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी त्यांची नजर चुकवून लंपास केली.

येथे क्लिक करा - विंध्यवासिनी देवीच्या मंदिराबाहेरील हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

कारमध्ये बसल्यानंतर ही बाब अश्विनी बिडवे यांच्या लक्षात आली. यावरुन तिला धीर देत अक्षय सूर्यकांत पत्रे राहणार पार्डी मक्ता तालुका अर्धापूर याच्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत जाधव करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT