नांदेड - जिल्हा परिषदेत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसंदर्भात बुधवारी कार्यशाळा घेण्यात आली. 
नांदेड

नांदेड जिल्हा परिषदेत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसंदर्भात कार्यशाळा

अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेत प्रत्‍येक नागरिकांनी सहभागी होऊन स्‍वतःच्‍या आरोग्‍याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. ही मोहिम आरोग्‍याच्‍या चळवळीसाठी महत्‍वाची असून या मोहिमेत सहयोगींनी यांनी रक्षक म्‍हणून काम करावे, असे प्रतिपादन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले.


महिला अर्थिक विकास महामंडळ आणि जिल्‍हा परिषदेच्‍या आरोग्‍य विभागाच्‍या वतीने बुधवारी (ता. ३०) जिल्‍हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या विषयी कार्यशाळा घेण्‍यात आली. त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. यावेळी अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, भारतीय वन सेवा विभागाच्‍या मधुमेता, आर्थिक विकास महामंडळाचे जिल्‍हा समन्‍वयक चंदनसिंग राठोड, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. शिवशक्‍ती पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रत्‍येकाने प्रयत्‍न करणे आवश्‍यक 
स्‍वत:बरोबरच आपल्‍या कुटुंबाचे संरक्षण ही ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा उद्देश आहे. जिल्ह्यात ही मोहिम प्रभावीपणे राबविण्‍यात येत आहे. आरोग्‍याची चळवळ होण्‍यासाठी प्रत्‍येकांने प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे. विशेषत: ग्रामीण भागातील बचतगटाचा सहभाग मिळविण्‍यासाठी ही कार्यशाळा घेतली जात आहे. कोरोनामुक्‍त कुटूंब व कोरोनामुक्‍त गाव करण्‍यासाठी सहयोगींनी बचतगटासह गावस्‍तरावरील नागरींकांच्‍या रक्षणासाठी नाविन्‍यपूर्ण उपक्रम राबवून मोहिम यशस्‍वी करावी असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले आहे.

अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन
प्रारंभी अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या माहिमेचे उद्देश सांगतांना म्‍हणाले की, प्रत्‍येक कुटुंबाच्‍या आरोग्‍यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम आहे. या मोहिमेत सहभागी होऊन कोरोनाचा प्रादूर्भाव आपण रोखू शकतो. कोरोनाची लक्षणे दिसताच स्‍वत: पुढे येवून तपासणी करुन घ्‍यावी. गृहभेटीसाठी येणा-या कर्मचा-यांना सहकार्य करुन आपल्‍या आरोग्‍यासाठी सांगण्‍यात आलेल्‍या आरोग्‍य सल्‍ल्‍याचे तंतोतंत पालन करावे, असेही ते म्‍हणाले. 

अशा करा मोहिम यशस्वी
जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. शिवशक्‍ती पवार यांनी कोरोना व सारी रोगाची लक्षणे, घ्‍यावयाची काळजी, मास्‍क व हॅड सॅनिटायझरचा वापर, सुरक्षित अंतर, गृह विलगीकरण, अ‍लगिकरण, गृहभेटीव्‍दारे साधवयाचा संवाद व तपासणी आदीबाबत मार्गदर्शन केले. महिला अर्थिक विकास महामंडळाचे जिल्‍हा समन्‍वयक यांनी कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक केले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील ३० सहयोगिनीं यांची उपस्थिती होती. या प्रसंगी मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्‍याहस्‍ते सहयोगीनींना माक्‍स व हॅडसॅनिटायझरचे वाटप करण्‍यात आले. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत गावस्‍तरावर राबवलेल्‍या उपक्रमासाठी व्‍हॉटस्अॅप ग्रुप तयार करुन दररोज राबविलेल्‍या उपक्रमाचे फोटो व माहिती देण्‍याच्‍या सूचना यावेळी सीईओ ठाकूर यांनी दिल्‍या.

त्रिसुत्रीचा अवलंब करा
कोरोनाचा प्रभाव अजूनही आहे. मला काय होतंय असे म्‍हणून नागरीकांनी हलगर्जीपणा करु नये. प्रत्‍येकांनी मास्‍क व हॅड सॅनिटायझरचा वापर तसेच सा‍माजिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा प्रत्‍येक नागरीकांनी अवलंब करणे आवश्‍यक आहे.
- वर्षा ठाकूर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा परिषद, नांदेड. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात नवं संकट, काळजी घ्या! PM मोदींकडून देशवासियांना महत्त्वाचं आवाहन

farmer Loan Relief: कर्जमाफीच्या निकषांकडे शेतकऱ्यांचे डोळे; ३० जूनपूर्वी जाहीर करण्याचा सरकारचा मानस, काय असतील संभाव्य निकष?

Latest Marathi News Live Update : गोकुळ दूध संघाच्या ‘हलाल सर्टिफिकेट’वरून नवा राजकीय वाद; कोल्हापूरच्या निवडणुकीत मुद्दा तापला

Are you Indian? तुमच्या देशात चालते व्हा...; अमेरिकन नागरिकाकडून भारतीय दाम्पत्याला अपमानास्पद वागणूक, VIDEO VIRAL

Road Accident : हृदयद्रावक घटना! राँग साइडने येणाऱ्या मालवाहू गाडीची दुचाकीला जोरदार धडक; 9 महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT