Suicide Sakal media
नांदेड

रेल्वेच्या खिडकीला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या, नांदेडमधील धक्कादायक घटना

नांदेड रेल्वेस्थानकात धक्कादायक घटना

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : नांदेड रेल्वेस्थानकात धक्कादायक घटना घडली आहे. तपोवन एक्स्प्रेसच्या खिडकीला बाहेरच्या बाजूने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली आहे. तपावन एक्स्प्रेस (Tapovan Express) ही नांदेडहून मुंबईला (Mumbai) निघणार होती. ही घटना आज बुधवारी (ता.३०) सकाळ नऊच्या आसपास घडली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नसून मृतदेह शासकीय रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला आहे. मृत तरुणाचा कोणी परिचित असल्यास लोहमार्ग पोलिस, नांदेड (Nanded) किंवा सहायक पोलिस उपनिरीक्षक विजया मेलफेदेवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. (Youth Hanged Himself On Railway Window In Nanded)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी तपोवन एक्स्प्रेस फलाट क्रमांक तीनवर उभी होती. या रेल्वेच्या (Railway) एका डब्यातील शौचालयाच्या बाहेरुन खिडकीला मोठ्या रुमालाने युवकाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती लोहमार्ग पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी रेल्वे प्रशासनाला कळवले.

सहायक पोलिस उपनिरीक्षक विजया मेलफेदेवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृताच्या खिशात ओळख पटवणारे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT