DP Sawant News esakal
नांदेड

नांदेडला थरार ! माजी मंत्री सावंतांच्या घरी पिस्तूलधारी तरुणाचा प्रवेश

पन्नास हजारांची मागणी करून नोकराला मारहाण

अभय कुळकजाईकर

नांदेड : माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांच्या नांदेड (Nanded) येथील शिवाजीनगर भागातील ‘आई’ या निवासस्थानी सोमवारी (ता. ३०) दुपारी तीनच्या सुमारास एका पिस्तूलधारी तरुणाने प्रवेश करून नोकराला भीती दाखवत मारहाण केली. पन्नास हजारांची मागणी केली. सावंत यांनी घराबाहेर येऊन इतरांना बोलावताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सावंत यांच्या निवासस्थानी सकाळी साडेनऊच्या सुमारास तरुण आला होता. मी बीडचा असून माझ्या वडिलांनी तुम्हाला भेटून मदत घेण्यास सांगितले आहे, असे त्याने सांगितले.

बीडमधील आमदार किंवा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे सांगून डी.पी.सावंत (DP Sawant) यांनी त्याला पाठवून दिले. त्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास तो पुन्हा घरी आला. मागील दरवाजाने स्वयंपाकघरात प्रवेश करून त्याने सुभाष पवार या नोकराला पकडले. त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून पन्नास हजारांची मागणी केली. काय झाले हे पाहण्यासाठी गेले असता सावंत यांनाही त्याने धमकावले. सावंत यांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने पवार यांना डोक्यात मारून जखमी केले. सावंत यांनी परिसरातील नागरिकांना बोलावले. पळून जाण्याच्या प्रयत्नातील तरुणाला नागरिकांनी पकडले व पोलिसांना कळवले. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर देशमुख, निरीक्षक डॉ. नितीश काशीकर यांनी भेट दिली. दरम्यान, कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी सावंत यांच्या निवासस्थानी धाव घेतली. पालकमंत्री अशोक चव्हाण यांना घटनेची माहिती देण्यात आली.

पिस्तूल नकली

साहील माने (वय ३५) असे या तरुणाचे नाव असून तो बीड (Beed) येथील रहिवासी आहे. त्याच्या जमीन प्रकरणासंदर्भात तो आला होता. त्याला अटक करण्यात आली आहे. तपासणीनतर त्याच्याकडील पिस्तूल नकली असल्याचे आढळले. तेही जप्त केले आहे. त्याच्या सोबतच्या एकाला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आणखी एक चूक अन् Shreyas Iyer वर बंदी! CSK विरुद्धच्या सामन्यांनंतर IPL ची कडक कारवाई; २४ लाखांचा दंड

ट्रक चोरीला गेला... पोलिसांनाही सापडेना, पण कर्जाचे हप्ते सुरू... अखेर तरुणाने संपवले जीवन, आईची मागितली माफी

Latest Marathi News Live Update : सांगलीत हद्दपार गुंडाकडून रुग्णवाहिकेची तोडफोड

Shaktipeeth Highway Update : शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलला! आता सातारा जिल्ह्यातील 'या' भागातून सुसाट धावणार गाड्या; जयकुमार गोरेंनी दिली महत्त्वाची अपडेट

CSK vs PBKS: ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या सलग दुसऱ्या पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार? म्हणाला, 'कधी कधी आमच्याकडून...'

SCROLL FOR NEXT