Nanded News 
नांदेड

Video - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ज्ञानमंदिरांचा आधार, कसा? ते बघाच

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी बाहेर जिल्ह्यातून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. गावपातळीवर अॅन्टी कोरोना टास्क  फोर्स  व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गावात प्रवेशित  होणाऱ्या नागरिकांना गावच्या ज्ञानमंदिरांमध्ये क्वारंटाईन करण्यात येत आहे. 

कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण चिंतेचा विषय ठरत आहे. ग्रामीण भागात प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाय योजनांसह जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे.   बाहेर  जिल्ह्यातून  जिल्ह्यात  आलेल्या  एक  लाख  २४ हजार  ६०० नागरिकांना  सोईनुसार गावच्या  जिल्हा  परिषद  शाळा,  समाज  मंदीरामध्ये क्वारंटाईन  करण्यात  आले  आहे. येत आहेत.   प्रशासनाच्या  परवानगीने  अथवा  प्रसंगी  छुप्या  मार्गाने  गावच्या वेशित  प्रवेश  करणाऱ्या  नागरिकांवर  अॅन्टी  कोरोना  टास्क  फोर्स व सतर्क ग्रामस्थांचा कडक  पहारा  आहे.

त्यामुळे शहरी भागाच्या  तुलनेत  ग्रामीण  भागात  बाहेर  जिल्ह्यातून आलेल्या  नागरिकांची  संख्या  अधिक  असली  तरी  गावपातळीवर नागरिकांची  सतर्कता व प्रशासनाच्या  हजरजबाबीपनामुळे कोरोनाला गावच्या वेशिबाहेर  रोखण्यात  सध्यातरी काही ठिकाणी यश आले आहे. बारड व मालवाडा  येथिल  कोरोना  बाधित  रुग्ण  तत्काळ समोर आले  आणि  वेळीच  त्यांना योग्य उपचारासाठी हलवण्यात  आले. 

हडसनीची शाळा झाली स्वच्छ
हडसनी (ता.हदगाव) येथे कोरोनोमुळे पुणे येथून  मूळ गावी आलेले सुभाष घुंगरराव हे सध्या जिल्हा परिषदेच्या शाळेत कॉरंटाइन झाले आहेत. सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सुभाष घुंगरराव हे अनेक उपक्रमांमध्येही आघाडीवर असतात. असाच उपक्रम त्यांनी या वेळेसही केला. त्यांनी जिल्हा परिषदेची शाळा स्वच्छ करण्यासाठी साफ सफाईची मोहिम राबवून एक वेगळा आदर्श घालून दिला. या कामासाठी त्यांना मिलिंद घुंगरराव, संदीप घुंगरराव, संतोष भालेराव, जितेंद्र भालेराव, शेख गफार यांचे सहकार्य मिळाले.

नागरिकांनी अशी घ्यावी काळजी
जिल्ह्यात  कोरोना  बाधित  रुग्णांची  शंभरी  पार  झाली.  नागरिकांनी न घाबरता वारंवार  साबनाणे  स्वच्छ  हात धुवावेत.  संशयीत  अथवा एखाद्या नागरिकास काही  लक्षणे  अढळून  आल्यास  तात्काळ आरोग्य विभागाशी  संपर्क  साधावा.  बाहेर जिल्ह्यातून  येणाऱ्या  नागरिकांची माहिती  अॅन्टी  कोरोना  टास्क  फोर्स,  दक्षता  समिती अथवा  आशा, आंगणवाडी  कर्मचारी,  आरोग्य  कर्मचारी यांनाअ देण्याचे  आवाहन जिल्हा  आरोग्य  अधिकारी  डाॅ. बालाजी  शिंदे  यांनी  केले  आहे. 

 

नागरिक जागृक झाले
कोविड १९ संदर्भात ग्रामिण  भागातील  नागरिक  जागृत झाले आहेत. त्यामुळेच  बाहेर  जिल्ह्यातून  येणाऱ्या  नागरिकांना  स्वयंस्फूर्तीने  क्वारंटाईन  होण्यास  भाग  पडावे लागत  आहे.
- डाॅ. शरद  कुलकर्णी ( मुख्यकार्यकारी  आधिकारी जिल्हा  परिषद)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

SCROLL FOR NEXT