Navratri Fasting Food esakal
नवरात्र

Navratri Fasting: नवरात्रीचे उपवास करताय? मग प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी खा 'या' गोष्टी

उपवासात प्रोटीनची कमतरता घालवण्यासाठी आहारात घ्या या गोष्टी

सकाळ डिजिटल टीम

Fasting Food: आजपासून नवरात्रीला सुरूवात झाली असून अनेक महिला आणि तरूणी देवीचा उपवास करतात. मात्र श्रद्धेने उपवास करता करता तुम्हाला तुमच्या शरीरातील प्रोटीन मेंटेन करणंही तेवढंच महत्वाचं ठरतं. अनेक लोक उपवासाच्या दिवसांत नॉनवेज आणि आलं-लसुण खात नाहीत. त्यामुळे या काळात तुमच्या शरीराला प्रोटीनचा सोर्स फार कमी प्रमाणात मिळू शकतो. तेव्हा तुमच्या शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी खावेत हे पदार्थ

1. डेअरी प्रोडक्ट (Dairy Product)

दूध प्रोटीनचा फार चांगला सोर्स मानला जातो. नवरात्रीमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारच्या डेअरी प्रोडक्टचा खाण्यासाठी वापर करू शकता. दही आणि पनीरयुक्त पदार्थ शरीरातील प्रोटीन वाढवण्यास मदत करतात. तुमचा उपवास असेल तर तुम्हा एनर्जेटिक ठेवण्यातही या गोष्टी तुम्हाला मदत करतात.

2. नट्स

बदाम आणि अक्रोडसारखे ड्राय फ्रुट्स प्रोटीनचा उत्तम सोर्स आहेत. त्यामुळे तुम्हाला जेव्हाही भूक लागेल तेव्हा बदाम खा. तसेच भोपळ्याच्या बीयाही तुम्ही खाऊ शकता.

शिंगाळ्याचं पिठ

शिंगाळ्याच्या पिठाचे विविध प्रकार करून तुम्ही नवरात्रीच्या उपवासात खाऊ शकता. शिंगाळ्याच्या पिठाचा पराठा किंवा तुम्हाला हव्या त्या पद्धतीचा पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकता.

प्रोटीन शेक किंवा ताक

उपवासात हायड्रेट राहाण्यासाठी प्रोटीन शेक घ्या. यात तुम्ही फ्रुट्स आणि मेवाही टाकू शकता. याशिवाय तुम्ही ताक किंवा लस्सी पिऊ शकता.

प्रोटीनयुक्त लाडू

सणासुदीच्या दिवसांमध्ये तुम्ही प्रोटीनयुक्त मेव्याचे लाडूही खाऊ शकता.

दाळ

तुम्ही एक वेळ उपवास आणि एक वेळ जेवण करत असाल तर तुमच्या डाएटमध्ये दाळीचा समावेश करा. दाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT