Navratri 2022 Esakal
नवरात्र

Navratri 2022: नवरात्रीत हे सहा यज्ञ का केले जातात?

तुम्हाला हे माहिती का ,पृथ्वीवर घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर ग्रहांचा प्रभाव असतो.

सकाळ डिजिटल टीम

पंचांगानुसार, शारदीय नवरात्री दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश लावल्या जातात आणि या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक दुर्गा सप्तशतीचे पठणही करतात. यावर्षी शारदीय नवरात्री 26 सप्टेंबर 2022 ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत साजरी केली जाणार आहे. तसेच नवरात्री यज्ञ सुध्दा करणात करतात .ते यज्ञ कोणते असतात ते का करावे याविषयीची सविस्तर माहिती आज आपण लेखात बघणार आहोत.

1. गणेश होम

कोणतेही कार्य पूर्णत्वास जाण्यासाठी सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोहो ऊर्जांचा त्यात समावेश असतो. नेहमीच या ऊर्जा बाह्य नसतात तर त्या आपले शरीर किंवा मन यासुद्धा असू शकतात. म्हणूनच सर्व विघ्नांना दूर करणाऱ्या विघ्नहर्ता गणपतीला प्रार्थना केली जाते. परंपरेनुसार कोणत्याही यज्ञाची सुरुवात करण्याआधी गणेश होम आणि पूजा केली जाते.

2. सुब्रमण्य होम

भगवान सुब्रमण्य हे विजयाचे देव आहेत. कोणत्याही प्रयासांमध्ये यश मिळवण्यासाठी ज्ञान शक्ती आवश्यक असते. म्हणूनच ब्रम्हण्य मंत्रांचे पठण करून भगवान सुब्रमण्य यांना आवाहन केले जाते.

3. नवग्रह होम

नवग्रह किंवा नऊ ग्रह हे महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्या ग्रहगतीचा प्रभाव संपूर्ण पृथ्वीवर तर पडतोच शिवाय त्यावर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांची ग्रहगती प्रभावित करते. म्हणूनच या नऊ ग्रहांचा त्यांना विविध आहुत्या अर्पण करून सन्मान केला जातो. असे करताना प्रत्येक ग्रहासाठी त्याचा विशिष्ठ मंत्र पठण केले जाते. विशिष्ट ग्रहांचा आपल्या शरीराच्या विशिष्ट भागांवर परिणाम होतो तसेच असा प्रभाव धान्ये आणि रात्नांवरही पडतो. पृथ्वीवर घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर ग्रहांचा प्रभाव असतो. त्यांच्या नकारात्मक परिणामांना कमी करण्यासाठी किंवा असा प्रभाव पडू नये यासाठी आणि आपल्यावर पडणाऱ्या त्यांच्या सकारात्मक प्रभावाला आणखी प्रबळ करण्यासाठी आपण या नऊ ग्रहांची प्रार्थना करतो.

4. रुद्र होम

रुद्र होम आपल्याला शांती प्रदान करतो आणि आपल्या जीवनातील सर्व दुःखे नष्ट करतो. या होमामध्ये ‘नमक आणि चमक’ मंत्रांचा समावेश असलेल्या रुद्र मंत्रांचे पठण केले जाते. रुद्र मंत्रांचा सन्मान केल्यामुळे आपल्याला गहन ध्यानामध्ये जाण्यास मदत होते आणि हे मंत्र सत्त्व, रजस आणि तमस या गुणांमध्ये संतुलन निर्माण करतात. रुद्र मंत्र या तीन गुणांचा प्रभाव कमी करतात आणि त्यामुळे आपण शून्यत्वाच्या स्थितीत जातो जी आपल्याला गहन ध्यानात जाण्यास मदत होते.

6. नव चंडी होम

चंडी होमामध्ये देवीला आवाहन केले जाते आणि त्यानंतर नवाक्षरी मंत्र जप केला जातो. हा होम झाल्यानंतर देवी पूजा केली जाते. महा चंडी होम हा नऊ वेळा करतात. म्हणून त्याला ‘नव चंडी होम’ म्हणतात. १०० वेळा जेव्हा हा केला जातो तेव्हा त्याला ‘शत चंडी होम’ म्हणतात; जेव्हा १००० वेळा केला जातो तेव्हा त्याला ‘सहस्र चंडी होम’ म्हणतात; आणि जेव्हा १०,००० वेळा केला जातो तेव्हा त्याला ‘अयुत चंडी होम’ म्हणतात. या प्रत्येक यज्ञाच्या विधी वेगवेगळ्या आहेत आणि सर्वसामान्यपणे नव चंडी होम केला जातो.

7. ऋषी होम

हा होम नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी केला जातो. ऋषी हे दृष्टाराह आहेत. म्हणजेच ते ज्यांनी गहन समाधीमध्ये राहून अवकाशातून वेदांचे मंत्र प्राप्त केले. मानवजातीच्या उन्नतीसाठी हे पवित्र ज्ञान ज्यांनी दिले त्या ऋषींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण ऋषी होम करतो. सप्तर्षी आणि इतर सर्व ऋषींकरिता प्रार्थना केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT