Navratri 2022 Esakal
नवरात्र

Navratri 2022: जोगवा का मागितला जातो ?

नऊ दिवसांमध्ये अनेक लोक दुर्गा सप्तशतीचे पठणही करतात.

सकाळ डिजिटल टीम

पंचांगानुसार, शारदीय नवरात्री दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश लावल्या जातात आणि या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक दुर्गा सप्तशतीचे पठणही करतात. यावर्षी शारदीय नवरात्री 26 सप्टेंबर 2022 ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत साजरी केली जाणार आहे.

नवरात्र हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात. अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. देव्हाऱ्यात अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते. कोणतेही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असतॆ, पण तिथीचा क्षय झाल्याने ते आठ दिवसांचे, किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांचे असू शकते.

जोगवा

जोगवा मागणे हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे. देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो. परडीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात. हे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालतात. अहंकाराचे विसर्जन करावे असा यामागचा हेतू असावा असे वाटते. एकनाथ महाराजांनी या जोगव्यावर एक भारूड रचले आहे. ते असे-

अनादी निर्गुण प्रगटली भवानी ।

मोह महिषासुर मर्दना लागुनी ॥

त्रिविध तापांची कराया झाडणी ।

भक्तांलागुनी पावसी निर्वाणी ॥

आईचा जोगवा जोगवा मागेन ।

द्वैत सारुनी माळ मी घालीन ॥

हाती बोधाचा झेंडा घेईन ।

भेदरहित वारिसी जाईन ॥

नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा ।

करुनी पीटी मागेन ज्ञानपुत्रा ॥

या भारुडात जोगवा मागण्याच्या विधीचे स्वरूप आणि तो मागण्यामागचे हेतू अप्रत्यक्षपणे व्यक्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Court Attack: शुभम चव्हाण हत्या प्रकरणाचा बदला? २०२५ मध्ये नेमकं काय घडलं होतं? मंदार किवळेवर हल्ला, भावाने घेतला भावाचा बदला?

Sheikh Hasina: दिल्लीत नेमक्या कोणत्या भागात राहतात शेख हसीना? कुठली माहिती आली समोर?

Pune Shivajinagar Court attack: शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्लेखोरांची ओळख पटली; पुणे पोलिसांकडून महत्त्वाचे अपडेट्स

Latest Marathi News Live Update: अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या निकृष्ट कामावरून संताप

IPL 2027 Auction : बेन स्टोक्ससाठी ३ संघ बक्कळ पैसा ओतणार, तिघांच्या खिशात ४० कोटींपेक्षा जास्त रक्कम; कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT