Navratri 2022
Navratri 2022 esakal
नवरात्र

Navratri 2022 : ‘ये मरहठन हार नही मानेगी आज’ ; कुस्तीपटू दुर्गा कोमल गोळे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एखाद्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करायची म्हणजे लहानपणापासून त्याचा सराव करावा लागतो. महाविद्यालयात असताना तर कोणाला नक्की काय करायचे आहे ते ठरलेलं असतं. पण, केवळ वेगळं काहीतरी करायचं म्हणून या क्षेत्रात आलेली आणि देशासाठी गोल्डमेडल मिळवलेल्या कोमल गोळेचा प्रवास आज जाणून घेऊयात.

नमस्कार मी कोमल गोळे वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचा प्रतिनिधित्व केलेली महाराष्ट्रातील पहिली महिला कुस्तीपटू आहे. माझ्या कुस्तीला फार उशिरा सुरुवात झाली. मुलीचे लग्नाचे वय होतं त्यावेळी मुली कुस्ती सोडतात. तेव्हा माझ्या कुस्तीला सुरुवात झाली. मला बरेच जण म्हणायचे की आता कुठे कुस्तीत उतरतेस. आता लग्नाचं वय झालं लग्न कर. पण, माझी इच्छा होती काहीतरी वेगळं करायची.

कॉलेजमध्ये असताना मला आमचे स्पोर्ट्स टीचर म्हणाले की, तू कुस्ती का खेळत नाही. मी मनातल्या मनात म्हणाले, की कुस्ती हा काय प्रकार असतो. कुस्ती काय असते हे पहायला मी कुस्ती प्रशिक्षण सेंटरवर गेले. त्याठिकाणी लहान मुलींचा सराव सुरू होता. त्या मुलींचे अंगाला फीट असलेले शॉर्ट कपडे पाहून वाटलं अरे असे कपडे घालून कसं खेळायचं. पण,वाटलं नव्हतं की, तोच ड्रेस कधीतरी माझं स्वप्न होईल.

यात आवड निर्माण झाल्यावर मागे इंडिया लिहिलेली जर्सी आपलीही असावी. एक खेळाडू म्हणून मला वाटत की, एक तर इंडियाच टॅग लागून आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. किंवा दुसरे म्हणजे शूर विरासरखे देशासाठी प्राण द्यायची तयारी ठेवली पाहिजे.

खरंतर कुस्तीला सुरुवात केली त्यावेळी मला सुरुवातीला लोकांनी बरेच काही ऐकवले. अरे आता या वयात मुली कुठे कुस्ती खेळतात का. मी एकदा राज्यस्तरीय स्पर्धा कशा असतात हे पहायला गेले. तिथं मुली कुस्ती खेळत होत्या. त्यांना पाहून मलाही वाटायला लागलं की आपण हे केलं पाहिजे. आणि मग तिथून मी सरावाला सुरुवात केली.

यात सराव करून मग हळूहळू राज्यस्तरीय मेडल मी जिंकू लागले. यश मिळत हे पाहून मग मला वाटायला लागलं की आपण नॅशनल मेडल घ्यायला हवे. त्यासाठी मला योग्य प्रशिक्षणाची गरज होती. मी त्यासाठी सेंटर शोधत होते. खंत वाटते की, मुलींसाठी म्हणावी अशी सेंटर नाहीयेत. सुरुवातीला मी बऱ्याच ठिकाणी सर्वे केला. त्यानंतर एक सेंटर निवडले आणि मी कुस्तीच्या प्रॅक्टिसला लागले.

मला यात कुटुंबाचा आधार होताच. पण काही दिवसांनी आर्थिक अडचणी वाढायला लागल्या. घरी तीन बहिणी आणि एक भाऊ त्यात माझा कुस्तीचा खर्च. त्यामुळे वडिलांना हातभार म्हणून मी मैदानात जाऊ लागले. एखादी स्त्री कुस्तीच्या मैदानात उतरतेय म्हणजे तिला काय भोगावं लागत याची जाणीव तेव्हा झाली. तिच्याकडे नाना प्रकारच्या नजरेने पाहिलं जायचं पण आपल्याला गरज आहे. म्हणून मी ते करू शकले.

मला अस विचारलं जातं की, तू पिरीयडमध्ये कशी खेळतेस गं. तूला त्रास होत नाही का?, मुलींना समाज थांबवू शकत नाही तर मला पिरीयड काय थांबवणार आहेत. पिरीयड माझ्या शरीराचा भाग आहेत. त्या मी स्वीकारल्या आहेत. पिरीयड आली म्हणून थांबून चालणार नाही. त्यामुळे मला त्याची सवय आहे.

मी नॅशनलला गेले आणि मेडल घेतलं. माझे इंडिया कॅम्पसाठी सिलेक्शन झालं. मला खेळायला संधी भेटली पण समोर होती दमदार हरियाणाची पोरगी. तीला असं वाटलं होत की, हिला तर आपण असंच हारवू शकतो. पण, मला माहीती होते की, माझ्या आयुष्यात ती शेवटची संधी आहे. ही संधी गमावली तर मला पुन्हा संधी नाही. मी कुस्ती खेळले.

ती पूर्णपणे मला डिफेन्स करून मागं सरकवत होती. पण मी काय मागे सरकत नव्हते. कारण मला माहिती तर की जे काही करायचं ते आजचं. जी काय ताकद लावायची ती इथेच. मी ती लावली आणि तीला पूर्ण ताकदीने मागे ढकलले. हाफ टाइमनंतर ती पुन्हा मला मागे ढकलत होती. पण, मी ऐकत नव्हते. स्टेडीयममधील तिच्या बाजूने असलेले लोकही मग ओरडायला लागले, ‘ये मरहठन हार नही मानेगी आज’,त्याने अधिक बळ मिळाले आणि मी मेडल जिंकले.

मी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. नुर सुलतान, कझागिस्तान येथे झालेल्या सिनियर वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्येही मी खेळले आहे. माझ्यासारख्या कितीतरी मुली येतील या क्षेत्रात. त्यांना इतकंच सांगेन की, कोणतेही यश हे अंतिम नसतं आणि अपयश ही घातक नसतं. त्या दोघांच्या मधली मजा लुटायला जो शिकला ना तो खूप मोठा होतो. त्यामुळे प्रयत्न करत रहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT