Marathi-Actress-Tejaswini-Pandit
Marathi-Actress-Tejaswini-Pandit 
नवरात्र

Navratri Festival 2019 : तेजस्विनी दिसली 'कोल्हापूरच्या अंबाबाई'च्या रुपात!

सकाळ डिजिटल टीम

राज्यासह देशभरात आजपासून नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरवात झाली. गावांपासून शहरांपर्यंत सगळीकडेच सार्वजनिक मंडळांनीही यंदा जोरदार तयारी केलेली दिसून आली. 

सामान्य गृहिणींपासून ते सेलेब्रिटींपर्यंत सगळ्याच महिलांसाठी खूप विशेष आणि जिव्हाळ्याचा उत्सव जर कोणता असेल, तर तो म्हणजे नवरात्रोत्सव! सोशल मीडियावरही अनेकांनी एकमेकांना नवरात्रीचा शुभेच्छा दिल्या आहेत. 

मराठी चित्रपट विश्वातील तारका आणि लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडितने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर एक पोस्ट प्रसिद्ध केली आहे. नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा देताना तिने 'कोल्हापूरची अंबाबाई'च्या रुपातील स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. 

ऑगस्ट महिन्यामध्ये सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात आलेल्या अभूतपूर्व पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. काहीजणांना आपला जीवही गमवावा लागला. त्याला अनुसरूनच तेजस्विनीने फोटोला कॅप्शन दिलं आहे. 

“याच उघड्या डोळ्यांनी विनाशाचं तांडव पाहत होते मी…माझ्यासमोर जोडले जाणारे अनेक हात वाहत जाताना पाहत होते मी…

पण मी अवतरणार तरी कशी ? सावरणारे माझे हात टप्या टप्प्याने छाटलेस तू… कधी मोठया रस्त्यांसाठी, कधी साखर कारखान्यांसाठी, तर कधी उंच इमारतींसाठी. ज्या किरणांनी माझं तेज प्रदीप्तीत व्हायचं त्याच्या मार्गातच तुझ्या स्वार्थाचे होर्डिंग्ज लावलेस. मत्स्येंद्री ने फ़ुलणारा माझा रंकाळा जलपर्णीनी जखडून टाकलास तू…म्हणून सावरू शकले नाही तुला…

पण शेवटी मी आई आहे. कठोर झाले तरी साथ नाही सोडणार…
मी बहारायचं नाही सोडणार
मी बहारायचं नाही सोडणार”

अशी विदारक परिस्थिती मांडणारं कॅप्शन तिने दिलं आहे. गेल्या वर्षीही तिने देवीची नऊ रुपे सोशल मीडियावर अपलोड केली होती. यंदाही तिने पहिल्याच दिवशी हा एक फोटो अपलोड करून सगळ्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. याबद्दल तिच्यावर सोशल मीडियाद्वारे कौतुकाचा वर्षावही होत आहे.

त्यामुळे आगामी दिवसांत देवीच्या विविध रुपातील तिचे आणखी फोटो पुन्हा एकदा बघायला मिळतील का? याची उत्सुकता लागून राहिली आहे.  

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT