Saade tin Shaktipeeth Esakal
नवरात्र

Navratri 2022: साडेतीन शक्तीपीठाचा इतिहास नेमका काय आहे?

महालक्ष्मी पीठ हे स्वतःभोवती भोवर्‍यासारखे वलयांकित ज्ञानशक्तीचे भ्रमण दर्शवते.

सकाळ डिजिटल टीम

पंचांगानुसार, शारदीय नवरात्री दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश लावल्या जातात आणि या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक दुर्गा सप्तशतीचे पठणही करतात. यावर्षी शारदीय नवरात्री 26 सप्टेंबर 2022 ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत साजरी केली जाणार आहे.

आता बघू या साडेतीन शक्तीपीठाचा निर्मितीचा इतिहास काय आहे?

दक्ष प्रजापती यांची पुत्री देवी सती स्वत:च्या पित्याने आयोजित केलेल्या यज्ञ समारंभामध्ये पती शिव यांचा अपमान सहन करू शकली नाही आणि त्याच यज्ञवेदीमध्ये उडी घेऊन देवी सतीने तिचे जीवन संपवले. भगवान शिवाला जेवढा राग स्वत:च्या अपमानाचा आला नाही, त्यापेक्षा अधिक दु:ख सतीच्या मरणाने झाले. या दुर्घटनेने भगवान शिव अस्वस्थ झाले. त्यांनी सतीच्या मृत शरिराला खांद्यावर घेऊन प्रलयंकारी तांडव नृत्याला आरंभ केला.

त्यामुळे संपूर्ण विश्‍व विनाशाच्या मार्गावर येऊन पोचले. ही सर्व स्थिती पाहून सर्व देवता श्रीविष्णूंच्या जवळ गेले आणि हा प्रलय रोखण्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना केली. देवतांच्या विनंतीवर भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने सतीचे शरीर 51 भागांत हळूहळू खंडित केले. अशा प्रकारे देवी सतीच्या शरिराचे 51 भाग झाले. ज्या ज्या स्थानावर देवीच्या शरिराचा अंश पडत होता, तेथे शक्तीपीठ स्थापन झाले. त्रिपुरा येथील या ठिकाणी देवीच्या पायांची बोटे पडली होती.

● महाराष्ट्रातील शक्तीपिठे

महाराष्ट्रातील शक्तीपिठांच्या देवी, प्रतीक, कार्य आणि कार्याचा स्तर 

1) कोल्हापूरची श्री महालक्ष्मी राजतेज देहात ज्ञानशक्तीच्या बळावर पितृशाहीरूपी राजधर्माचा मुकुट चढवून इच्छेची निर्मिती आणि क्रियेची जागृती या प्रक्रियांना आवश्यकतेप्रमाणे गती देऊन त्यांच्यात सातत्य टिकवणारी ज्ञानशक्ती

(पूर्ण पीठ)

2) तुळजापूरची श्री भवानी ब्राह्मतेज देहातील सर्व कोषांना शुद्ध करून देहात शक्तीचे घनीकरण करणारी क्रियाशक्ती

(पूर्ण पीठ)

3) माहूरची श्री रेणूका क्षात्रतेज देहातील रज-तमकणांचे उच्चाटन करून इच्छाशक्तीच्या बळावर कार्याची इच्छा मनात निर्माण करणारी इच्छाशक्ती

(पूर्ण पीठ)

4) वणीची श्री सप्तशृंगी संयोगी तेज चैतन्य प्रदान करणारी आणि तीनही शक्तीपिठांतील शक्तीलहरींचे नियंत्रण करून त्यांचा शक्तीस्त्रोत आवश्यकतेप्रमाणे त्या त्या दिशेला वळवणारी इच्छा, क्रिया किंवा ज्ञान मिश्रित संयोगी शक्ती

(अर्धे पीठ)

महाराष्ट्र भूमीत असलेली ही साडेतीन शक्तीपिठे आपल्या संतुलित लयबद्ध ऊर्जेच्या स्तरावर संपूर्ण भारताची आध्यात्मिक स्थिती नियंत्रणात ठेवून त्याचे वाईट शक्तींच्या प्रकोपापासून रक्षण करत आहेत; म्हणून गेली अनेक दशके अनेक रूपांतून झालेल्या वाईट शक्तींच्या आक्रमणांतूनही भारत सावरलेला आहे. महाराष्ट्रात घनीभूत झालेल्या या साडेतीन स्वयंभू शक्तीस्त्रोताच्या कार्यरत प्रवाहाचा परिणाम म्हणूनच महाराष्ट्राला अनेक संतांची परंपरा लाभली आहे.

महालक्ष्मी पीठ हे स्वतःभोवती भोवर्‍यासारखे वलयांकित ज्ञानशक्तीचे भ्रमण दर्शवते. भवानी पीठ हे स्वतःच्या केंद्रबिंदूतून क्रियाशक्तीचा झोत प्रक्षेपित करून कार्य करते, तर रेणूका पीठ हे क्षात्रतेजाने भारित किरणांचे प्रक्षेपण करते. महाराष्ट्रात या तिन्ही शक्तीपिठांची स्थाने एकापाठोपाठ एक इच्छा, क्रिया आणि ज्ञान या शक्तींच्या क्रमानुसारच असून त्यांच्या डोक्यावर निर्गुण शक्तीपीठ म्हणून तिन्ही शक्तीपिठांचा मुकूटमणी म्हणून वणीचे स्थान आहे. प्रत्यक्ष पहातांनाही आपल्या आकृतीबंधातून चारही स्थाने मुकुटासारखा भाग नकाशाच्या पृष्ठभागावर प्रत्यक्ष निर्माण करतात. असा हा शक्तीपिठांचा एकमेकांशी संतुलित संबंध ठेवून कार्य करणारा शक्तीमहिमा आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT