wine 
पश्चिम महाराष्ट्र

अबब..! एका दिवसात 27 हजार लिटर दारूची व्रिकी; सोलापुरातील "हे" तालुके आघाडीवर 

तात्या लांडगे

सोलापूर : लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर शहर-जिल्ह्यातील काही मोजक्‍या दुकानांना अटी व शर्थीनुसार परवानगी देण्यात आली आहे. तळीरामांनी त्या दुकानांबाहेर अक्षरश: रांग लावली असून 14 जूनला एका दिवसात 27 हजार लिटर मद्यविक्री झाली असून त्यातून शासनाला 17 लाखांचा महसूल मिळाला आहे. 


कोरोनामुळे दिवसेंदिवस वाढत असलेला लॉकडाउन अन्‌ रेड झोनमधील सोलापुरातील बंद असलेल्या मद्यविक्रीच्या दुकानांमुळे तळीराम बेचैन झाले होते. आता पंढरपूर, करमाळा, अकलूज, सांगोला आणि शहर परिसरातील काही मद्यविक्री दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. सोशल डिस्टन्स ठेवणे, ग्राहकांनी मास्क घातलेले असावे यासह अन्य नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी देताना स्पष्ट केले. या नियमांचे पालन करीत तळीरामांनी मद्यविक्री दुकानांसमोर रांग लावून उभे राहत आहेत. मद्यविक्रीत अनुक्रमे सांगोला, अकलूज (माळशिरस), करमाळा आणि पंढरपूर हे तालुके आघाडीवर आहेत. 


तालुकानिहाय मद्यविक्री (लिटरमध्ये) 
सांगोला : 5,760 लिटर 
अकलूज : 5,670 लिटर 
करमाळा : 4,850 लिटर 
पंढरपूर : 4,589 लिटर 


देशी दारुची विक्री जोमात 
लॉकडाउनमुळे हातचे काम गेल्याने आर्थिक टंचाईचा सामना करणाऱ्या तळीरामांनी आपला मोर्चा देशी दारुकडे वळविल्याचे चित्र आहे. 14 जून रोजी विक्री झालेल्या 27 हजार लिटरमध्ये 12 हजार 384 लिटर देशी दारु विकल्याची नोंद राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे झाली आहे. तर 10 हजार 438 लिटर विदेशी दारु आणि तीन हजार 869 लिटर बिअरची व्रिकी झाली आहे. अन्य दारु 123 लिटर विकल्याचेही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Prediction : सोने १ लाख २५ हजारांवर पोहोचणार?, जून महिन्यात ८.२८ टक्क्यांनी दरात घसरण; तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज

Latest Marathi News Update : पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते

Success Story: दिवसा मोलमजुरी, पहाटे घाटरस्त्यावर धावण्याचा सराव; विकास काळेची प्रेरणादायी पोलिस भरारी, घर नाही, क्लास नाही... पण जिद्द होती..

Mhada Lottey : म्हाडाची लॉटरी रखडली, सोडत लांबल्याने अर्जदारांची आर्थिक ओढाताण

Pune: उरुळी कांचन येथे "कृषि विभागाच्या विविध योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मेळावा

SCROLL FOR NEXT