mpsc logo 
पश्चिम महाराष्ट्र

स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी खुशखबर...का ते नक्‍की वाचा ! 

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार अध्यक्ष आणि एका सदस्यावर सुरु आहे. वास्तविक पाहता आयोगात चार सदस्य व अध्यक्ष असणे आवश्‍यक आहे. मात्र, मागील दिड वर्षांपासून रिक्‍त असलेल्या तीन सदस्यांची आता नियुक्‍ती केली जाणार आहे. त्यासाठी शासनाने अर्ज मागविले असून तीन पदांसाठी राज्यातून 28 अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जांची छाननी प्रक्रिया सुरु असून फेब्रुवारीपर्यंत नव्या सदस्यांची निवड केली जाणार आहे. 


महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड करण्याचे काम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होते. उपजिल्हाधिकारी, पोलीस-उपअधीक्षक, तहसीलदार, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी या पदांसह राज्य सेवा परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा, सहायक मोटर वाहन निरीक्षक, सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी -2, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-ब, पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक परीक्षा कर सहायक गट- क परीक्षा आणि लिपिक-टंकलेखकांची परीक्षाही आयोगाच्या माध्यमातून घेतली जाते. आयोगातील रिक्‍त पदांमुळे 2017 पासून पोलिस अधिकाऱ्यांसह अन्य उमेदवारांची परीक्षाच घेतली जाते. राज्यातील वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणांचा कल आता स्पर्धा परीक्षांकडे वाढू लागला आहे. परीक्षा अन्‌ भरती प्रक्रिया वेळेत पार पडावी या हेतूने आयोगातील तीन सदस्यांची नियुक्‍ती फेब्रुवारीअखेर केली जाणार आहे. 


तीन सदस्यांसाठी 28 अर्ज 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील तीन सदस्यांची पदे रिक्‍त असून त्यांची निवडीची प्रक्रिया लवकरच होणार आहे. पुढील आठवड्यात त्यावर वरिष्ठ स्तरावरून निर्णय अपेक्षित असून त्यानंतर प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया सुरु होईल. 
- सिताराम कुंटे, अप्पर मुख्य सचिव, सेवा, मुंबई 


ठळक बाबी... 

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तीन सदस्य पदांसाठी राज्यातून 28 अर्ज 
  • अर्जांची छाननी प्रक्रिया सुरु : फेब्रुवारीत मिळणार नवे तीन सदस्य 
  • राज्य सरकारला अर्जाची दिली माहिती : नव्या सदस्यांसाठी लवकरच मुलाखती 
  • आयोगाच्या भरती प्रक्रियेला येणार वेग : रखडलेली भरती प्रक्रिया लागणार मार्गी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

Pankaja Munde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांसमोर आक्रोश, सरकार शेतकरी-पशु पालकांच्या पाठीशी

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

SCROLL FOR NEXT