पश्चिम महाराष्ट्र

शिवसेना नगरसेवकाच्या मोटारीतून 33 हजाराची रोकड लंपास 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - शिवसेनेचे नगरसेवक नियाज खान यांच्या दारात उभी केलेल्या मोटारीची बाटलीने काच फोडून अज्ञाताने त्यातील 33 हजाराची रोकड लंपास केली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याची नोंद राजारामपुरी पोलिसात झाली आहे.

सध्या निवडणुकीच्या प्रचाराचा माहोल सुरू असून यातूच हा प्रकार घडल्याची शक्‍यता व्यक्त करत नगरसेवकांसह मित्रपरिवारांने त्या अनुषंगाने तपास व्हावा, अशी मागणी पोलिसांकडे केली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, नगरसेवक नियाज खान वाय. पी. पोवार नगरात राहतात. काल रात्री ते दैनदिन काम अटोपून रात्री अकराच्या सुमारास घरी आले. त्यांनी आपली मोटार दारात लावली. त्यानंतर ते जेवण करून झोपी गेले.

दरम्यान अज्ञाताने त्यांच्या मोटारीची पाठीमागील व चालकाच्या बाजूची काच बाटलीने फोडली. त्यानंतर डॅशबॉक्‍समध्ये ठेवलेली 33 हजार 400 रूपयाची रोकड लंपास केली. आज सकाळी खान यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी याची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली.

दरम्यान खान यांची मोटार फोडल्याची वार्ता शहरात पसरली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावरून हा प्रकार घडला असावा अशा शक्‍यता वर्तविण्यात आल्या. त्यांच्याकडे याबाबत विचारणा होऊ लागली. यानंतर ते फिर्याद देण्यासाठी राजारामपुरी पोलिसात गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक राहूल चव्हाण यांच्यासह असिफ सौदागर, महेश उत्तुरे, सागर यवलुजे, गणी आजरेकर हे पोलिसात आले. त्यांनी या प्रकरणाचा केवळ चोरीसह इतर अनुषंगानेही तपास करावा, अशी मागणी केली. पोलिस उपनिरीक्षक समाधान घुगे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल असे आश्‍वासन त्यांना दिले. 

दारात लावली मोटार फोडून त्यातील रोकड लंपास केल्याचा प्रकार सकाळी निदर्शनास आला. हा प्रकार राजकारणातूही झाला असावा असा माझा संशय आहे. त्यानुसारही पोलिसांनी तपास करावा अशी मी मागणी केली आहे. 
- नियाज खान, 
नगरसेवक  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Marathi News Live Updates : आयआयटी मुंबईबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT