A 55 year old woman raped accused died in the beating 
पश्चिम महाराष्ट्र

55 वर्षीय महिलेवर अत्याचार; बेदम मारहाणीत आरोपीचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

अकोले : तालुक्‍यातील आदिवासी दुर्गम भागातील एका गावाच्या शिवारात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय महिलेवर एकाने अत्याचार केला. त्यामुळे पीडित महिलेच्या संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी आरोपीस पकडून, दगडी बाकाला बांधून बेदम चोप दिला. त्यात गंभीर जखमी झाल्याने आरोपीचा मृत्यू झाला. राजू गणपत सोनवणे (वय 45, रा. शिरपुंजे, ता. अकोले) असे या मृत आरोपीचे नाव आहे. याबाबत राजूर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध अत्याचाराचा, तर पीडित महिलेच्या कुटुंबीयांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अत्याचाराबाबत पीडित महिलेने राजूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पीडित महिला मंगळवारी (ता. 4) दुपारी साडेबाराच्या सुमारास जायनावाडी गावाच्या शिवारातील खंडोबाच्या माळावर जनावरे चारण्यासाठी घेऊन गेली होती. त्या वेळी आरोपी राजू सोनवणे याने महिलेवरच अत्याचार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

बाकाला बांधून आरोपीला बेदम मारहाण

दरम्यान, पीडित महिलेने हा प्रकार घरी आल्यावर कुटुंबीयांना सांगितला. त्यामुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी गावातील दगडी बाकाला बांधून आरोपीला बेदम मारहाण केली. मारहाणीत आरोपी गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्यास राजूर पोलिस ठाण्यात आणले. तेथील तपासणीसाठी त्याला राजूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला नाशिकला हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 

तिघांविरोधात खुनाचा गुन्हा

याबाबत गावातील पोलिस पाटलांनी राजूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महिलेवरील अत्याचाराच्या रागातून तिच्या कुटुंबीयांनी मंगळवारी (ता. 4) दुपारी 2 ते 4 वाजेदरम्यान राजू सोनवणे यास बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून राजूर पोलिसांनी पीडित महिलेच्या कुटुंबातील तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. सर्व आरोपींना अटक केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील करीत आहेत.

घटनेने खळबळ

दरम्यान, आदिवासी दुर्गम भागातील महिलेवर अत्याचार, तसेच अत्याचार करणाऱ्याचा खून, अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक दीपाली काळे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू, उज्ज्वल निकम कोर्टात हजर

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT