Koyna Dam Patan Satara esakal
पश्चिम महाराष्ट्र

Koyna Dam : कोयनेतील पाणीसाठ्याने 'ताकारी' शेतकऱ्यांवर संकट; धरणात फक्त 'इतका' TMC साठा, पिकांचं होणार नुकसान?

पावसाळ्यात कोयना धरण पूर्ण न भरल्याने ‘ताकारी’ लाभक्षेत्रातील शेतकरी (Farmer) चिंताग्रस्त झालेत.

रवींद्र मोहिते

कोयना धरणातील कमी साठ्यामुळे सर्वच सिंचन योजनांना काही प्रमाणात कमी पाणी मिळणार आहे.

वांगी : दुष्काळी कडेगाव, खानापूर व तासगाव तालुक्यातील बहुतांश गावांना मागील २५ वर्षांपासून सुजलाम्-सुफलाम् करणाऱ्या ताकारी योजनेचे (Takari Scheme) भवितव्य कोयना धरणातील (Koyna Dam) जलसाठ्यावर अवलंबून असते. यंदा पर्जन्यमान कमी झाल्याचा परिणाम म्हणून धरणात कमी पाणीसाठा झाला आहे.

यंदा धरण पूर्ण भरलेच नाही. सध्या ९० टीएमसी पाणीसाठा आहे. पावसाळ्यात कोयना धरण पूर्ण न भरल्याने ‘ताकारी’ लाभक्षेत्रातील शेतकरी (Farmer) चिंताग्रस्त झाले. ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेकडो हेक्टर शेती केवळ कोयना धरणातील पाण्यावर अवलंबून आहे.

यापूर्वी या भागात कमी पाऊस होत असे, तरीही कोयना धरण भरले, की ताकारी लाभक्षेत्रातील शेतकरी निश्चिंत असे. याच ‘ताकारी’च्या पाण्याने २५ वर्षांत लाभक्षेत्रात प्रचंड आर्थिक समृद्धी आली. या योजनेच्या पाण्याने दृष्ट लागण्यासारखी शेती पिकून सामान्यांच्या जीवनात झालेला आर्थिक बदल इथली जनता अनुभवत आहे. ऊस, द्राक्ष, केळी, हळद, आले याशिवाय फळ-पालेभाज्या उत्पादनातून शेतकरी प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये मिळवीत आहेत.

यंदा कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यामुळे तरतुदीप्रमाणे सिंचन व वीजनिर्मितीला पाणी कमी पडणार आहे. परिणामी दोन्हींवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. धरणाची सुरवातीला पाणीसाठवण क्षमता ९८.८८ टीएमसी होती. नंतर वाढविण्यात आल्याने २००६ पासून धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा होऊ लागला. कोयना पाणलोट क्षेत्रात प्रतिवर्षी सरासरी पाच हजार मिलिमीटरवर पाऊस होतो. साधारणतः प्रतिवर्षी कोयना धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा होत असतो. त्यातील ६७.५० टीएमसी वीजनिर्मिती, तर ५५ टीएमसी पाण्याची तरतूद सिंचनासाठी आहे.

सिंचनासाठीचे पाणी पावसाळ्यातील विसर्ग धरून आहे. यंदा मात्र धरणात अपुरा पाणीसाठा असल्याने सिंचन व वीजनिर्मितीवरही परिणाम होण्याची भीती आहे. १५ ऑक्टोबरचा धरणातील पाणीसाठा विचारात घेऊन सिंचन व वीजनिर्मितीसाठी किती पाणी राहणार, हे निश्चित होत असते. यंदाप्रमाणेच यापूर्वीही कोयना धरण आठवेळा पूर्ण क्षमतेने भरले नव्हते.

कोयना धरणातील कमी साठ्यामुळे सर्वच सिंचन योजनांना काही प्रमाणात कमी पाणी मिळणार आहे. उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे पाण्याचा अपव्यय टाळून जपून वापरावे, अशी चर्चा जिल्हा नियोजन समितीतही झाली.

-राजन डवरी, कार्यकारी अभियंता, ताकारी योजना

कोयना धरण भरले नाही ते वर्ष व तत्कालीन पाणीसाठा (टीएमसी)

  • १९६८ ९४.२०

  • १९७२ ८९.६९

  • १९८७ ९१.२३

  • १९९५ ७६.२९

  • २००० ८७.१५

  • २००१ ८८.२२

  • २००३ ९३.५५

  • २०१५ ७८.७४

  • २०२३ ९२.९१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT