accident in belgaum one college student died in accident 
पश्चिम महाराष्ट्र

अचानक आडव्या आलेल्या मोटारीला भरधाव दुचाकीची धडक ; अपघातात एकजण जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : रस्त्यात अचानक आडव्या आलेल्या मोटारीला भरधाव दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. गुरुवारी (ता.२८) दुपारी २.४५ च्या सुमारास जिल्हा क्रीडांगणासमोर हा अपघात झाला. साईराज संभाजी कडोलकर (वय २२, रा. काकती) असे मृताचे नाव आहे. तर गौतम (वय १७, रा. काकती) असे जखमीचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, साईराज व गौतम वैयक्‍तिक कामासाठी बेळगावला आले होते. काम आटोपून ते केएलई रोडवरुन दुचाकीवरुन काकतीकडे परतत होते. जिल्हा क्रीडांगणाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोटार अचानक रस्त्यावर आडवी आली. त्यामुळे, दुचाकीने मोटारीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार साईराज जागीच ठार झाला. तर मागे बसलेला गौतम गंभीर जखमी झाला. मोटारीच्या समोरील भागाचेही मोठे नुकसान झाले.

मुख्य रस्त्यावरच अपघात झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. जखमीला उपचारासाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती समजताच उत्तर वाहतूक पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीशैल गाबी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जिल्हा रुग्णालयातील शवागृहात उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. साईराजच्या मागे आई, वडील, आजोबा, एक भाऊ, काका असा परिवार आहे. अपघाताची नोंद उत्तर वाहतूक पोलिस ठाण्यात झाली आहे. अपघातग्रस्त मोटार मोहन सिद्धाप्पा हुगार (रा. महांतेशनगर) यांच्या मालकीची आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! वर्षा गायकवाडांकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी; 'या' तीन नामवंतांनाही मिळाली संधी

Maharashtra Bar Strike : मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरातील बार उद्या राहणार बंद; HRAWI चा जाहीर पाठिंबा, काय आहे कारण?

Kolhapur : ए. एस. ट्रेडर्सच्या माध्यमातून कोल्हापूर व बेळगावातील गोरगरिबांना लुटायचा, पोलिसांनी ट्रॅप लावून मुख्य एजंटला केली अटक

Flight Cancellation:'तांत्रिक कारणामुळे गोव्यातून विमानाचे उड्डाण रद्द'; ५९ प्रवासी सोलापूर विमानतळावरून परतले; नाईट लॅंडिंग नसल्याने गैरसोय

Latest Marathi News Updates : मराठीबहुल मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना भेटणार; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा निर्णय

SCROLL FOR NEXT