Ad Ujjwal Nikam Exclusive Interview by Esakal.gif 
पश्चिम महाराष्ट्र

संजय झाला व्हिलन, मी झालो हिरो, 93 च्या बॉंम्बस्फोट खटल्याचा उलगडला पट

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : न्यायाधिशांनी 7 वर्षांची शिक्षा सुनावताच संजय दत्त कोसळला, थरथर कापू लागला. "मी त्याला म्हणालो "डरो मत, लोग तुम्हे डरपोक समझेंगे.' गुन्हा सिद्ध झाल्याने त्या दिवशी संजय लोकांच्या मनातील व्हिलन ठरला. आणि मी हिरो झालो. अशा शब्दात विशेष सरकारी वकिल पद्मश्री डॉ.उज्वल निकम यांनी 93 च्या बॉंम्बस्फोट खटल्याचा पट उलगडला. 
अजमल कसाबची फाशी, टायगर मेनन, अबुसालेम या सर्वांबरोबर त्यांचा झालेला संवाद त्यांनी श्रोत्यांना ऐकवला. सखी सबला फौंडेशनच्या रौप्य महोत्सव उद्घाटन सोहळ्याला ते प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

यावेळी "जे सांगेन ते खरे सांगेन' हा त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. यावेळी ऍड.निकम बोलत होते. शाहू सांस्कृतिक भवन येथे हा सोहळा झाला. 
उच्च न्यायालयातील वकील ऍड.प्रियांका राणे-पाटील यांनी निकम यांची मुलाखत घेतली. यावेळी उज्वल निकम म्हणाले,""गुन्हेगाराशी मी बोलतो. त्यामुळे त्याच्या मनात काय सुरू आहे, ते मला कळते. संजय दत्तला आपण सुटणार असे वाटत होते. त्यामुळे तो निर्धास्त दिसत होता. मात्र जसे न्यायाधिशांनी "तू दोषी असून तूला 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोवण्यात येत आहे,' असे सांगितले. तसा हा "हिरो' लटलट कापू लागला. तो कोसळला. मी त्याच्या जवळ गेलो. त्याचा हात हातात घेतला. त्याला म्हणालो, तू रडलास तर लोक तुला डरपोक समजतील. मग पुढे तुझे सिनेमे कोण पाहणार. त्याला ते पटले मग तो स्थिर उभारला. संजय दत्त विषयी सहानभूती बाळगणारा एक मोठा वर्ग त्यावेळी होता. जर संजय रडला असता तर त्याच्याबद्दल हळहळ वाटणाऱ्यांचा तो हिरो ठरला असता. मी तसे होऊ दिले नाही. त्यामुळे गुन्हा सिद्ध झाल्याने तो व्हिलनच झाला आणि मी मात्र हिरो ठरलो.' अबु सालेम बद्दल निकम म्हणाले, "तुझ्या सारख्या गुन्हेगाराशी मोनिका बेदीने लग्न कसे केले? असे विचारल्यावर त्याला राग आला. पण या प्रश्‍नातून मी त्याला तू कायद्यापुढे गुन्हेगारच आहेस. तुझी पात्रता तेवढीच आहे हे दाखवून दिले. गुन्हेगाराला जेव्हा शिक्षा होते त्यावेळी ते सुधारत नाहीत. पण त्याच्या मनात पश्‍चातापाची भावना निर्माण होते. हीच त्याची शिक्षा असते.' 
यावेळी महापौर ऍड.सुमंजिरी लाटकर, उद्योजक नेमचंद संघवी, सबला फौंडेशनच्या अध्यक्षा प्रा.आशा मणियार, उपाध्यक्ष हिमा शहा, खजिनदार रेखा मेहता, गोकूळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

भिती नाही अभिमान वाटतो 
मुलाखतीच्या वेळी उज्वल निकम यांच्या पत्नी ज्योती यांनाही प्रश्‍न विचारण्यात आले. दहशतवाद्यांच्या विरोधात खटले लढणाऱ्या पती बरोबर संसार करताना भिती वाटते का? यावर त्या म्हणाल्या 1993 खटल्यावेळी थोडी काळजी वाटली पण आता भिती नाही अभिमान वाटतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT