Additional Commissioner of Co-operation Satish Soni was suspended
Additional Commissioner of Co-operation Satish Soni was suspended 
पश्चिम महाराष्ट्र

"कॅंडी क्रश'ची चित्रफीत प्रभारी सहकार आयुक्तांच्या अंगलट

डॉ. बाळ ज. बोठे पाटील

नगर : "महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019'च्या माहितीची लिंक पाठविताना हेतुपुरस्सर केलेल्या चुकीमुळे राज्य सरकारची सर्वत्र बदनामी झाल्याचा ठपका ठेवत राज्याचे प्रभारी सहकार आयुक्त तथा सहकार विभागाचे अपर आयुक्त सतीश सोनी यांना काल (ता. 21) निलंबित करण्यात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या आदेशावरून महाराष्ट्र सरकारचे उपसचिव डॉ. सुदिन गायकवाड यांनी सोनी यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला. 

शेतकरी कर्जमाफी योजनेसंदर्भात राज्य सरकारने 18 जानेवारी 2020 रोजी चित्रफीत उपलब्ध करून दिली होती. तथापि, सरकारने कर्जमाफीसंदर्भात सरकारने दिलेली लिंक उघडल्यानंतर कर्जमाफीच्या चित्रफितीऐवजी "कॅंडी क्रश'ची चित्रफीत उघडली जात असल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचा आरोप करत सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली. त्यामुळे सरकारतर्फे अत्यंत तातडीने या प्रकाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. खातेनिहाय प्राथमिक चौकशीत सोनी दोषी असल्याचे आढळून आले आहे. प्रभारी सहकार आयुक्त सोनी यांनी कृषी आयुक्तांकडे पाठविलेल्या लिंकचा शोध घेतला असता, सोनी यांच्याकडूनच दोन मेल कृषी विभागाला पाठविण्यात आल्याचे उघड झाले आहे. 

कृषी आयुक्तांनाच चुकीचा "यूआरएल' पाठविला

प्रभारी सहकार आयुक्तांकडूनच 9 व 10 जानेवारीस हे दोन मेल पाठविण्यात आल्याचे उघड झाले. त्यात एका लिंकमधून कृषी आयुक्तांनाच चुकीचा "यूआरएल' पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रभारी सहकार आयुक्तांमुळेच सरकारच्या एका महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत व्यत्यय निर्माण झाल्याचा अभिप्राय चौकशी समितीने दिलेला आहे. प्रभारी आयुक्तांकडून ही चूक अनवधानाने झाली, असे म्हणता येणार नसून, ती हेतुपुरस्सर केली असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, असे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

योजनेची बदनामी केल्याचा ठपका

या पार्श्‍वभूमीवर सोनी यांच्यावर राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या महत्त्वाकांक्षी योजनेची बदनामी केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979च्या भाग 2 नियम चारचे खंड (1) (अ) मधील तरतुदींच्या आधारे सोनी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

बेजबाबदारपणाची खातेनिहाय चौकशी

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची ही योजना अत्यंत महत्त्वाचा विषय असताना त्याकडे अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष पुरविण्याची गरज होती. तथापि, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने ही चूक झाली. त्यामुळे झालेली चूक अनवधानाने झाली, असेही म्हणता येणार नसल्याचा अभिप्राय चौकशी समितीने दिला. शिवाय या चुकीमुळे राज्य सरकारची बदनामी झाली आणि सरकारला आरोपांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे प्रभारी सहकार आयुक्‍तांकडे सोपविलेल्या कामात झालेल्या अक्षम्य हलगर्जीपणा, दुर्लक्ष व बेजबाबदारपणाची खातेनिहाय चौकशी करावी लागेल, असा अहवाल समितीने दिलेला असल्याने सोनी यांची खातेनिहाय चौकशी करावी, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Fact Check: भाजप एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण रद्द करेल, असा दावा करणारा अमित शहांचा व्हायरल व्हिडिओ एडिटेड

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये होणार नरेंद्र मोदींची जाहीर सभा

संतापजनक! वन-वे रोडवर रिक्षा चालकाने अचानक यू-टर्न घेतला अन् तरुणाचा जीव गेला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT