prakash_ambedkar 
पश्चिम महाराष्ट्र

नक्‍की वाचाच...ऍड. आंबेडकरांचे पदाधिकाऱ्यांना पत्र 

तात्या लांडगे

सोलापूर : देशात वर्षानुवर्षे राहणाऱ्या हिंदूंना 1951 पूर्वीचे पुरावे नागरिकत्त्वासाठी द्यावे लागणार आहेत. मात्र, देशातील बहूतांश जमातींकडे पुरावेच नाहीत. त्यामुळे मोदी सरकारने घेतलेला एनआरसी व सीएएच्या नावाखाली चालवलेला देश विभाजनाचा डाव आखला आहे. तो हाणून पार पाडण्याच्या हेतूने आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी वंचित बहूजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकरांनी पदाधिकाऱ्यांना पत्र पाठविले. त्यानुसार शनिवारी (ता. 4) प्रदेश प्रवक्‍ते आनंद चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापुरात बैठक पार पडली. 


मोदी सरकारने नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप (एनआरसी) व सीएए (सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्‍ट) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाव नोंदविण्यासाठी जन्म प्रमाणपत्र बंधनकारक आहे. मात्र, देशात अनेकजण अशिक्षित असून अनेकांकडे जन्माचे पुरावेही नाहीत. त्यामुळे बऱ्याच नागरिकांना प्रमाणपत्र मिळविण्यास अडचणी येणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर विविध संघटना, राजकीय पक्षांनी विरोधात भूमिका घेतली असून जानेवारीत देशभर आंदोलनाचा भडका उडण्याचे चित्र दिसू लागले आहे. ऍड. आंबेडकर यांनी नुकताच मुंबईत एनआरसी व सीएएला विरोध करीत मोर्चा काढला. आता राज्यभर आंदोलनाची दिशा ठरली असून 6 जानवोरीला सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदांसमोर निर्देशने व मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली जाणार आहे. आंदोलनाला गर्दी जमवून ते यशस्वी करण्याची जबाबदारी वंचितच्या जिल्हाध्यक्ष व प्रदेश प्रवक्‍त्यांवर सोपविण्यात आल्याची चर्चा आहे. त्यानुसार बैठकांचा जोर सुरु झाला असून कॉर्नर सभांचेही नियोजन करण्यात आले आहे. या बैठकीला नगरसेविका ज्योती बमगोंडे, नगरसेवक गणेश पुजारी, वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बनसोडे, बबन शिंदे, शहराध्यक्षा रेश्‍मा मुल्ला, अंजना गायकवाड, धम्मरक्षिता कांबळे, सुजाता वाघमारे, पल्लवी सुरवसे, हेमा वाघमारे, मंदाकिनी शिंगे, आशालता शिवशरण, फुलावती काटे, मिनाक्षी बनसोडे, पुष्पा गायकवाड, मुक्‍ता बनसोडे, पुष्पा आव्हाड आदी उपस्थित होते. 


आंदोलनातील प्रमुख मागण्या... 
- लोकशाहीला धोकादायक असलेला एनआरसी व सीएएचा निर्णय मोदी सरकारने रद्द करावा 
- उत्तर प्रदेशातील विद्यार्थी, युवक, महिलांवरील अत्याचाराची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी व्हावी 
- मुळ भारतीय असलेल्या अशिक्षितांकडे नाहीत 1951 पूर्वीचे पुरावे : निर्णय रद्द करावा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT