airoplane image 
पश्चिम महाराष्ट्र

विमानतळ अडथळ्याच्या बैठकीत  'श्री सिद्धेश्‍वर'च्या अडथळ्याला बगल 

तात्या लांडगे

सोलापूर : होटगी रोडवरील विमानसेवा सुरळीत व्हावी, यासाठी पाच वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी 18 प्रकारचे अडथळे असून सर्वात मोठा अडथळा म्हणजे श्री सिध्देश्‍वर साखर कारखान्याच्या चिमणीचा असल्याचे अधिकाऱ्यांनी यापूर्वी सातत्याने सांगितले. मात्र, शुक्रवारी खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांच्या अध्यक्षतेखालील एअरपोर्ट कमिटीच्या बैठकीत आमदार सुभाष देशमुख वगळता अन्य कोणीही कारखान्याच्या चिमणीबाबत 'ब्र' ही काढला नसल्याचे बैठकीतील सूत्रांनी सांगितले. 


खासदारांच्या अध्यक्षतेखाली एअरपोर्ट समितीची सहा महिन्याला बैठक होणे अपेक्षित आहे. मात्र, या समितीची दोन वर्षांपासून बैठकच झाली नाही. खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. 17) समितीची बैठक झाली. यावेळी आमदार सुभाष देशमुख, महापालिका आयुक्‍त दीपक तावरे, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, बोरामणी विमानतळाचे व्यवस्थापक सज्जन निचळ, होटगी रोड विमानतळाचे इन्चार्ज संतोष कोलगी उपस्थित होते. दरम्यान उच्च व सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिले असतानाही चिमणीबद्दल कार्यवाही होत नसल्याची खंत आमदार देशमुख यांनी बोलून दाखविली. त्यावर राज्य सरकारने कारखान्याच्या निवेदनानुसार माहिती मागविली असून त्यानुसार माहिती पुरविली जात असल्याचे उत्तर आयुक्‍त दिपक तावरे यांनी दिले. बोरामणी विमानतळाबद्दलही या बैठकीत चर्चा झाली. मात्र, ठोस निर्णय झाला नसल्याचे बैठकीतील सूत्रांनी सांगितले. होटगी रोडवरील विमानतळाच्या तुलनेत बोरामणी विमानतळाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचेही सांगण्यात आले. 


बोरामणी विमानतळासाठी बुधवारी बैठक 
होटगी रोडवरील विमानसेवेसाठी कारखान्याच्या चिमणीसह अन्य प्रकारचे अडथळे असल्याने बारोमणी विमानतळ सुरु करावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. खासदार डॉ. महास्वामी यांनी केंद्रीय हवाई उडाण मंत्र्यांची भेट घेतली होती. तर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांनीही बोरामणी विमानतळाविषयी चर्चा केली होती. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. 22) मुंबईत विमानतळ विकास प्राधिकरणाच्या सचिव वल्सा नायर यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरण कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT