Airport startup movements
Airport startup movements 
पश्चिम महाराष्ट्र

विमानतळ सुरू होण्याच्या हालचाली

सतीश वैजापूरकर

शिर्डी (नगर) ः महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने अर्धवट स्थितीत सुरू केलेले शिर्डी विमानतळ कमी दृश्‍यमानतेवर मात करू शकणारी यंत्रणा नसल्याने गेल्या 22 दिवसांपासून बंद आहे. आता ही यंत्रणा काही प्रमाणात कार्यान्वित झाली. दिल्ली येथील "डायरेक्‍टर जनरल ऑफ सिव्हिल एवीशन'च्या पथकाने निरीक्षण करून या यंत्रणेच्या आधारे दिवसा विमानसेवा सुरू ठेवण्यास मान्यता दिल्याचे समजते. त्याआधारे येत्या 10 दिवसांत येथून विमानसेवा सुरू करण्याची पूर्वतयारी "स्पाइस जेट' व "इंडिगो' या विमान कंपन्यांनी सुरू केली आहे. 

यापूर्वी पाच किलोमीटरपेक्षा कमी दृश्‍यमानता असली, तर येथे विमानसेवा सुरू ठेवणे शक्‍य होत नव्हते. त्यामुळे हे विमानतळ बंद ठेवण्याची वेळ आली. आता दीड किलोमीटर दृश्‍यमानता (व्हिजिबिलिटी) असली, तरी छोटे "एटीआर' आणि "क्‍यू-फॉर 100' ही विमाने ये-जा करू शकतील. तसेच अडीच किलोमीटर दृश्‍यमानता असेल, तर "बोईंग'सारखे मोठे विमानही ये-जा करू शकेल. विमान कंपन्यांना तशी माहिती कळविल्याने त्यांनी हवाईसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

येत्या 10 डिसेंबरपर्यंत येथील हवाईसेवा बंद करण्याचे "स्पाइसजेट' व "इंडिगो' कंपन्यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. येथून हलविलेली यंत्रणा व कर्मचारी पुन्हा येथे आणणे, तसेच अन्य कामांसाठी पुढील 10 दिवस पुरेसे आहेत. नवीन कुठलीही अडचण आली नाही, तर येत्या 15 ते 16 डिसेंबरपासून येथून विमानसेवा सुरू करता येईल, अशी आशा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना आहे. 

समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा

शिर्डी विमानतळावर "नाइट लॅंडिंग' सेवा लगेच सुरू होण्याची चिन्हे नाहीत. ही सेवा सुरू झाल्याशिवाय शिर्डी विमानतळ फायद्यात येणार नाही. जगाच्या नकाशावर येणार नाही. कार्गो विमानसेवा सुरू होणार नाही. कमी दृश्‍यमानतेवर मात करणारी यंत्रणा व "नाइट लॅंडिंग' या विमानतळ सुरळीत चालविण्यासाठी आवश्‍यक असलेल्या सुविधांकडे महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाने दुर्लक्ष केले. अर्धवट स्थितीत विमानतळ सुरू केले. आधी विमानतळ उभारणीचे काम रेंगाळले. आता विमानसेवा मध्येच बंद करण्याची वेळ आली. आपण या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत. 

- खासदार सदाशिव लोखंडे  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda : वादग्रस्त विधानानंतर सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा

SRH vs LSG Live Score : केएलनं नाणेफेक जिंकली; तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

SCROLL FOR NEXT