janavar bajar 
पश्चिम महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी...सिध्देश्‍वर यात्रेनिमित्त जनावरांचा शनिवारपासून बाजार 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : ग्रामदैवत सिध्देश्‍वर यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर विजयपूर रस्त्यालगत रेवणसिद्धेश्‍वर मंदिरसमोरीला मोकळ्या जागेत जनावरांचा बाजार भरणार असल्याची माहिती जनावर बाजार समितीचे अध्यक्ष चिदानंद वनारोटे यांनी दिली. या जनावर बाजारात महाराष्ट्रातील मराठवाड्यासह अनेक खेड्यांतून तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात येथील जनावरे विक्रीस दाखल होणार आहेत. खिलार, गीर, देवणी जातीचे वळू व बैल, तसेच घोडेगाव, म्हैसाना येथून मुरा, पंढपूर, जाफराबादी जातीच्या म्हशी, गाय, शेळ्या, मेंढ्या विक्रीस दाखल होणार आहेत. 

यंदा पाच ते सहा हजार जनावरे बाजारात विक्रीस येणार 
यंदा पाच ते सहा हजार जनावरे बाजारात विक्रीस येणार असल्याचा अंदाज आहे. या बाजारात जवळपास पाच ते सात कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. बाजारात जनावरे विक्रीस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सिद्धेश्‍वर देवस्थान मंदिर समितीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मैदानावर प्रत्येक ठिकाणी सायंकाळी विद्युत दिवे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी पाच टॉवर उभारण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा स्वतंत्र हौद बांधण्यात आला आहे. जनावर बाजारात कोणतीही अडचण येऊ नये याकरिता सिद्धेश्‍वर यात्रेचे अध्यक्ष बाळासाहेब पटणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. यात काशिनाथ दर्गोपाटील, मल्लिनाथ कळके, सुभाष मुनाळे, नीलकंठ कोन्हापुरे सदस्य असणार आहेत. 


दोन आठवडे उशिरा सुरू होतोय बाजार 
दोन ते तीन वर्षांपासून रेवणसिद्धेश्‍वर समोर मोकळ्या मैदानावर जनावर बाजार भरविण्यास अडचणी येत होत्या. बाजूलाच प्राणी संग्रहालय असून येथे जनावर बाजार भरत असल्याने संग्रहालयातील प्राण्यांना धोका असल्याने महापालिका येथे बाजार भरविण्यास परवानगी देत नव्हती. मात्र, मंदिर समितीने पर्यायी जागेसाठी पत्र दिले होते. तेथे जनावर बाजार भरविण्यास अडचणी येत असल्याने रेवणसिद्धेश्‍वर मंदिर समोरच्या जागेवरच जनावर बाजार भरविण्यास परवानगी दिली. मात्र, परवानगी देण्यास दोन आठवडे विलंब झाल्याने कित्येक व्यापाऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरवली असल्याची खंत मंदिर समितीच्या सदस्यांनी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT