Accident esakal
पश्चिम महाराष्ट्र

कोगनोळी जवळील अपघातात अंकलीतील एकाचा मृत्यू

येथील राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. 19) रात्री आठ वाजता दुचाकीला अपघात झाला होता.

सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गावर (National HighWay) रविवारी (ता. 19) रात्री आठ वाजता दुचाकीला अपघात (Accident) झाला होता. या अपघातात अंकली (ता. चिक्कोडी) येथील अभिजीत अण्णासाहेब माने (वय 40) हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी कागल येथील शासकीय रुग्णालयात (Government Hospital) नेण्यात आले होते. पण त्याचा वाटेतच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी (Doctor) सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, अभिजीत माने हे शेती व्यवसाय करत होते. कोल्हापूरहून अंकलीला जाण्यासाठी निपाणीच्या दिशेने जात होते. येथील कोगनोळी फाट्यावर पोलिसांच्या वतीने लावण्यात आलेल्या बॅरिकेटला त्यांच्या दुचाकीची जोरात धडक बसली. या अपघातात अभिजित माने हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ कागल येथील रुग्णालयात नेण्यात आले, पण त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.

घटनास्थळी कोगनोळी पोलिस ठाण्याचे एएसआय एस. ए. टोलगी, राजू गोरखनावर, अमर चंदनशिव यांनी भेट देऊन पाहणी केली. अभिजित माने यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. उत्तरीय तपासणी केल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Drought : मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला भाजप आमदाराची धक्काबुक्की? धाराशिवच्या व्हिडिओवरून दानवेंचा गंभीर आरोप

Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

Gadchiroli Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीने केला दौरा दुर्गम भागातील रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षणासह अन्य सुविधांची पाहणी

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

Edible Oil Import Duty Cut : खाद्यतेलाचे दर उतरणार?, आयात शुल्कात मोठी कपात; सणासुदीत ग्राहकांना मोठा फायदा

SCROLL FOR NEXT