Anti-bribery Department esakal
पश्चिम महाराष्ट्र

'इतक्या' लाखाची लाच स्वीकारताना साताऱ्याच्या समाजकल्याण अधिकाऱ्याला 'लाचलुचपत'ने रंगेहात पकडले

लाचलुचपत विभागाने आज समाजकल्याण विभागात सापळा लावला होता.

सकाळ डिजिटल टीम

क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांना निवासी शाळेत शिक्षण देण्याकरिता ५९ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते.

सांगली : जिल्ह्यातील एका निवासी शाळेकरिता मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या दहा टक्के म्हणजे ६ लाखांची मागणी करून १ लाखाची लाच स्वीकारताना सातारा येथील जिल्हा समाजकल्याण अधिकारी (Social Welfare Officer) तथा सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील प्रभारी सहायक संचालकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Division) पथकाने रंगेहात पकडले. सपना सुखदेव घोळवे (वय ४०) असे संशयित महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.

दरम्यान, याच प्रकरणात येथील समाजकल्याण निरीक्षक दीपक भगवान पाटील (वय ३६) याने आश्रम शाळेच्या अनुदानाचा धनादेश दिल्याचा मोबदला म्हणून १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत घटनेची माहिती अशी, तक्रारदार यांच्या संस्थेस शासनातर्फे भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांना निवासी शाळेत शिक्षण देण्याकरिता ५९ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. याकरिता अनुदानाचा धनादेश देण्यासाठी सहायक संचालक सपना घोळवे हिने दहा टक्के म्हणजे ६ लाख रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली. अखेर चर्चेअंती १ लाख रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागात तक्रार दिली.

लाचलुचपत विभागाने आज समाजकल्याण विभागात सापळा लावला होता. अधिकारी घोळवे हिने तक्रारदाराकडे १ लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले, तर समाजकल्याण निरीक्षक दीपक पाटील याने तक्रारदाराकडे आश्रम शाळेच्या अनुदानाचे धनादेश काढण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदाराने आणलेली १ लाखाची रक्कम स्वीकारताना घोळवे हिला रंगेहात पकडण्यात आले.

तर, लाचेची मागणी करणाऱ्या निरीक्षक दीपक पाटील यास ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपतचे उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अंमलदार सीमा माने, अजित पाटील, प्रतिम चौगुले, सलीम मकानदार, धनंजय खाडे, ऋषिकेश बडणीकर, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे, राधिका माने, चंद्रकांत जाधव, विना जाधव, अनिस वंटमुरे यांचा कारवाई सहभाग होता.

अनेक तक्रारी

सातारा येथे समाजकल्याण अधिकारी सपना घोळवे यांच्या विरोधात अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

Talegaon Abuse Case : बांगलादेशी अल्पवयीन मुलीवर डांबून ठेवत अत्याचार ; तळेगाव एमआयडीसी पोलीसांकडून एकास अटक!

SCROLL FOR NEXT