पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत खाकी वर्दीच्या दंडुक्याने ॲपेक्सला दणका

शैलेश पेटकर

सांगली : पोलिसांच्या अटकेत असलेला डॉ. महेश जाधव (dr. mahesh jadhav) याने विश्रामबागच्या (vishrambag sangli) एका हॉस्पिटलमध्ये गतवर्षी कोरोना सेंटर (corona centre) सुरू केले होते. त्याठिकाणी रुग्णांकडून तक्रारी झाल्या. संतप्त रुग्णांच्या नातेवाईकांनी तोडफोडही केली. याप्रकरणाकडे प्रशासनाने डोळेझाक केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही ॲपेक्ससाठी (apex hospital) केवळ एका अर्जावर प्रशासनाने जास्त खोलात न जाता परवानगी दिली. त्याठिकाणी रुग्णांच्या जीवाशी पुन्हा खेळ मांडण्यात आला. तक्रारी वाढल्याने महापालिकेने गुन्हा दाखल केल्याने पोलिसांनी खाकी वर्दीच्या दंडुक्याने (sangli police) ॲपेक्सला दणका दिला.

सांगली-मिरज (miraj-sangli road) रस्त्यावरील ॲपेक्स हॉस्पिटलला कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी तब्बल पन्नास खाटांचे रुग्णालय चालविण्याची परवानगी देताना महसूल प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने या रुग्णालयातील सोयी सुविधा, नियुक्त केलेले कर्मचारी, तज्ज्ञ डॉक्टरांची नावे याची कसलीही खातरजमा केली नव्हती का याचीही चौकशी झाली पाहिजे. त्यामुळेच या रुग्णालयात एक दोन नव्हे, तर ८७ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले, असा आरोप आता होत असून पोलिस तपासात असा ठपका ठेवण्यात आला आहे. यात पहिल्या टप्प्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सखोल तपास करताना रुग्णांच्या तक्रारी वाढत गेल्या. त्याचवेळी ॲपेक्स हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या समित्यांनाही सहकार्य केले नाही.

बिल तपासणी, कागदपत्रे तपासणी हे केले नाही. लेखा तपासणी पथकाला सहकार्य न करणे असे प्रकार समोर आल्याने महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. यामुळे डॉ. जाधव याच्या भोवतीचा कारवाईचा फास आणखी घट्ट झाला. कोरोना रुग्णालयासाठी शासनाने घालून दिलेल्या नियम धाब्यावर बसवत निष्काळजीपणे आणि बेजबाबदारपणामुळे अनेक रुग्णांचे मृत्यू समोर आले. त्यानंतर डॉ. महेश जाधव याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. अटकपूर्वसाठी जाधव धावाधाव करत होता. परंतु न्यायालयाने संधी दिली नाही. त्यामुळे पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या जाधवला पाठलाग करून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिस कोठडी घेत अनेक धक्कादायक प्रकार पोलिस तपासात पुढे आले.

कोरोना उपचारात हलगर्जीपणा व बेजबाबदारपणा दाखून रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी राज्यात हॉस्पिटल आणि डॉक्टरवर कारवाई होण्याचा हा पहिलाच प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. आत्तापर्यंत दहा जणांना याप्रकरणी अटक झाली. ॲपेक्स प्रकरण पोलिसांनी चव्हाट्यावर आणत आपली जबाबदारी पार पाडली. यातील दोषींवर शासन होण्यासाठी पोलिसांचे दोषारोपपत्र दाखल होईलच, मात्र या प्रकरणाला बळकटी देण्यासाठी सामाजिक, राजकीय संघटनांनीही यात भूमिका घेणे महत्त्वाचे आहे.

मेडिकल कौन्सिलकडे लक्ष

पोलिसांनी तत्काळ जाधव याच्या सर्व हॉस्पिटलची तपासणी केली. त्यावेळी अप्रशिक्षित स्टाफ दिसून आला. राज्यातील पाचही दवाखान्यांचे वैद्यकीय परवाने रद्दसाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल तसेच राष्ट्रीय मेडिकल कौन्सिलशी थेट पत्रव्यवहारही केला आहे. पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडली. आता कौन्सिलची जबाबदारी पार पाडण्याची वेळ आली आहे. डॉ. जाधवच्या मालमत्तेचीही चौकशी केली जाणार असून, बँक खाती गोठवण्याच्या हालचाली सुरू आहेत.

पोलिसांच्या आक्रमक भूमिका

कोरोना काळात डॉक्टरांकडून महत्त्वाची भूमिका बजावली जात आहे. या काळात उपचारात हलगर्जीपणा व बेजबाबदारपणा केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत चव्हाण हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. तपसातील प्रत्येक अपडेट स्वतः अधीक्षक गेडाम घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Result 2024 : महाराष्ट्रात यंदा बारावीच्या निकालात मुलींचा डंका, जाणून घ्या कसा आहे निकाल?

Latest Marathi News Live Update: राज्याचा बारावीचा निकाल जाहीर; ९३.३७ टक्के लागला निकाल

Pune Accident: पुणे अपघात प्रकरणी कारवाईला वेग! बार मालक, मॅनेजरसह पाच जणांना अटक

Gold Loan: आरबीआयच्या कडक नियमांमुळे गोल्ड लोन घेणाऱ्यांच्या अडचणी वाढणार; आता मिळणार कमी पैसे

Jaish e Mohammed: जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना जन्मठेपेच्या शिक्षेतून सूट, निकाल देताना दिला रशियन लेखकाचा दाखला

SCROLL FOR NEXT