apology post by candidates in Karmala after voting  
पश्चिम महाराष्ट्र

मतदानानंतर उमेदवार मागताहेत माफी...

नानासाहेब पठाडे

पोथरे (सोलपूर) : विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान झाले व प्रचार थांबला. प्रचारातील कटुता संपण्यासाठी पातळीवरील बहुतांशी नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर दिलगिरी व्यक्त करण्याच्या पोस्ट टाकल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीत एकमेकांची मने दुखावली असतील तर मला क्षमा करा, निवडणूक संपली राजकारण संपलं, मैत्री संबंध पुन्हा ठेऊया, अशा पोस्ट येऊ लागल्याने राजकारणातून  निर्माण झालेली कटुता कमी होत आहे. तर स्वतःहून क्षमा व माफी मागितल्याने गाव पातळीवर यांच्याविषयी सहानुभूती तर मिळतच आहे. शिवाय राजकारणापुरतेच राजकारण व इतर वेळी समाजकारण हा फार मोठा संदेश यातून मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा जोरदार धुमाकूळ होता. पदयात्रा, कॉर्नर सभा, जाहीर सभा, होम टू होम प्रचार, मतदारांची फोडाफोडी, एकमेकांची टीकाटीपणी करण्यात आली. काहींनी व्यक्तिगत, सामाजिक, वैचारिक टीका केली. तर काहींनी जातीवादावर सुद्धा टीका केली. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टिका झाल्या व प्रचाराची हद्द झाली होती. पण काल सायंकाळी मतदान संपताच बहुतांशी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आता निवडणुक संपली, वाद संपला, आमच्याकडून कुणाची मने दुखावली असतील तर मला क्षमा करा आपले मैत्रीसंबंध चांगली ठेवूया भविष्यात चांगले काम करूया अशा प्रकारे सोशल मीडियावर पोस्ट फिरून समाजातील कटूतेचे वातावरण बदलवण्याची एक चांगली प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे राजकारणामुळे टोकाला जाणारे वाद कमी होऊन समाजामध्ये सुव्यवस्था व शांतता राहण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे.

राजकारणाच्या माध्यमातून समाजाचे हित करायचे असते व यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तींशी मैत्रीचे, आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध असणे गरजेचे आहे.
- हरिश्चंद्र झिंजाडे, पोथरे.

राजकारणातून होणारा दुरावा हा प्रगतीसाठी घातक आहे. राजकारण संपताच आपली मैत्री कायम ठेवणे प्रत्येकाच्या हिताचे आहे. 
- राज झिंजाडे, सामाजीक कार्यकर्ते पोथरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT