Are they going to start the tanker after the death? Asked question of the distressed citizens
Are they going to start the tanker after the death? Asked question of the distressed citizens 
पश्चिम महाराष्ट्र

जीव गेल्यावर टॅंकर सुरू करणार का?; टंचाईने त्रस्त नागरिकांचा सवाल

संजय जगताप

मायणी - खटाव व माणमधील अनेक गावं तहानेने व्याकुळ असताना प्रशासन मात्र वेळकाढुपणा करीत आहे. सुरवातीला टंचाई जाहीर झाली नसल्याचे तुणतुणे वाजवणारे अधिकारी आता टंचाईच्या प्रस्तावात त्रूटी काढुन टॅंकर सुरू करण्यास चालढकल करीत आहेत. असंवेदनशील प्रशासनाविरुद्ध नागरिकांतुन प्रचंड संताप व्यक्त केला जात असुन आमचा जीव गेल्यावर टॅंकर सुरू करणार आहेत का? असा संतप्त सवाल केला जात आहे. 
   
टाव व माण तालुक्यातील अनेक गावांत साधारण जानेवारीपासुनच टंचाई जाणवण्यास सुरवात होते. मात्र गावात पाणीटंचाई आहे असे म्हणणे सत्ताधाऱ्यांना कमीपणाचे वाटत असल्याने विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करतात. उपलब्ध सगळे स्त्रोत आटेपर्यंत, टंचाई नरडीला येईपर्यंत वेळकाढुपणा केला जातो. त्यामुळे दिवसेंदिवस टंचाईची तीव्रता वाढतच जाते. लोकांचा उद्रेक व्हायला लागताच मग नाईलाजास्तव टॅंकरचा प्रस्ताव केला जातो.

यंदाही खटाव व माणमधील सुमारे सत्तर ते ऐंशी गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. संबंधित गावांनी टॅंकर सुरू होण्यासाठी आवश्यक ते प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केले आहेत. काही गावांनी काळजी घेत फेब्रुवारी ते मार्च दरम्यानच टॅँकरचे प्रस्ताव सादर केलेत. मात्र दोन महिन्यापासुन ते शासन दरबारी धूळ खात पडलेत. टॅंकर सुरू व्हावेत. यासाठी सबंधित गावचे सरपंच, ग्रामसेवक, त्या भागातील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य या सर्वांनी टॅंकरसाठी वारंवार पाठपुरावाही केला आहे. मात्र अद्याप टंचाई जाहीर झाली नसल्याचे तुणतुणे वाजवत अधिकाऱ्यांनी टंचाईकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. पाणीटंचाई बाबत 'सकाळ'मध्ये वारंवार वृत्त प्रसिद्ध झाले. छायाचित्रांसह टंचाईचे वास्तव निदर्शनास आणले. त्यानंतर प्रशासनाने खटावमधील चाळीस व माणमधील एकतीस गावांत टंचाई जाहीर केली. मात्र टंचाई जाहीर करुन सुमारे तीन आठवडे सरले. तरीही त्या गावांमध्ये टॅंकर सुरू करण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलली नाहीत.

टंचाईकाळात लोकांना तातडीने पाणीपुरवठा करण्यास प्रथम प्राधान्य देणे आवश्यक असताना बेजबाबदार व असंवेदनशील अधिकारी गावोगावच्या प्रस्तावातील त्रुटी काढुन पुनःप्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत आहेत. खरे तर खटाव व माणमधील गटविकास अधिकारी, तहसिलदार, प्रांताधिकारी यांना टंचाईची माहिती आहे. त्यामुळे शासनाच्या नवीन तरतुदींनुसार प्रस्तावाचा नमुना सादर करण्याचे निवेदन त्यांनी आधीच प्रसिद्ध करायला हवे होते. लोक आता पाण्यासाठी व्याकुळ असताना अधिकाऱ्यांनी प्रस्तावात त्रुटी काढणे म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळल्यासारखे आहे. पाण्यासाठी आबालवृद्ध दाहीदिशा फिरत आहेत. त्यामध्ये एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे का ? असा संतप्त सवाल केला जात आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असुन लोक शहरी भागात स्थलांतरीत होऊ लागलेत. काही दिवसापुर्वी खासगी टॅंकरने उपलब्ध होणारे पाणी आता दुप्पट पैसे मोजुनही मिळेनासे झाले आहे. लोकांना तातडीने दिलासा देण्यासाठी प्रशासनाने विनाविलंब टॅंकर सुरू करणे आवश्यक आहे. 
  
टॅंकर सुरू करण्यासाठी वारंवार सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, पाठपुरावा केला. आधी टंचाई जाहीर नसल्याचे सांगितले जात होते. आता प्रस्तावात त्रुटी असल्याचे सांगुन चालढकल केली जात आहे. तातडीने टॅंकर सुरू करण्याची आवश्यकता आहे. - मेघा पुकळे (सदस्या, खटाव पंचायत समिती)

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT