Kumbhar 
पश्चिम महाराष्ट्र

मदतीअभावी "ही' कला नामशेष होण्याच्या मार्गावर

दयानंद कुंभार

वडाळा (सोलापूर) : "फिरत्या चाकावरती देई मातीला आकार... विठ्ठला तू वेडा कुंभार...' या पंक्ती फक्त भविष्यात चित्रफितीतून व दृक्‌श्राव्यातून अनुभवास मिळते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण, परंपरागत कुंभारकाम करणाऱ्या कुंभार समाजाला ग्रामीण भागात संसाराचा गाडा चालवताना सध्या मोठ्या अडचणीस तोंड द्यावे लागत आहे.

राहिले नाही उदरनिर्वाहाचे साधन
मकर संक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर रानमसले (ता. उत्तर सोलापूर) येथील भीमराव विष्णू कुंभार आज वयाच्या साठीतही हाताने चाक फिरवून कुंभारकाम करीत आहेत. वाडवडिलांपासून चालत आलेला हा व्यवसाय. मात्र गेल्या काही वर्षांत फ्रीज, बाटलीबंद पाणी, थंड पाण्याच्या जारने कुंभाराचा डेरा, माठ विक्रीत मोठी घट झाली आहे. मकर संक्रांतीस सुवासिनी महिला पाच सुगडांचा खाण खरेदी करून सुगडातून ओवसा (वाण) घेऊन ओटी भरून साजरा करतात. आता मात्र सध्या एकच सुगड बाकी बोळकी घेतात. यामुळे कुंभारांचा व्यवसाय आता उदरनिर्वाहाचे साधन राहिले नाही, अशी परिस्थिती असल्याचे भीमराव कुंभार यांनी सांगितले.

भाजप-सेनेच्या शासनकाळात मिळाला होता 10 कोटींचा निधी
प्रगत तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाच्या युगात बलुतेदार कुंभारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. कारण, बहुसंख्य कुंभार समाजाला शेतीवाडीही नाही. पूर्वी भट्टीसाठी मोफत मिळणाऱ्या सरपणाला आता पैसे मोजावे लागत आहेत. कुंभार कलेतून साकारणाऱ्या गणपतीच्या मूर्ती, डेरा, घागर, कुंड्या, सुगड, मोरवा ठेवण्यासाठी पुरेसा निवाराही नाही. भांडवल नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील कुंभार समाजाची कुंभारकला लोप पावण्याची शक्‍यता आहे.
महाराष्ट्रातील कुंभार समाज संघटनांच्या मागण्या व जनआंदोलनांमुळे भाजप-सेनेच्या सत्ताकाळात कुंभार समाजाच्या उन्नतीसाठी "माती कला बोर्ड'ची स्थापना करण्यात आली. समाजाच्या उन्नतीसाठी 10 कोटींचा निधीही दिला. मात्र सध्या जग झपाट्याने बदलत असताना खेडेगावातील कुंभारवाड्यात साधे यांत्रिक चाकही मिळत नाही, ही शोकांतिका आहे.

कुंभारकला टिकण्यासाठी राबवावेत विविध उपक्रम
सध्या कुंभार समाजासाठी माती कला बोर्ड माध्यमातून कुंभार कलाकारास चिखल मळणी यंत्र, यांत्रिक चाक, निवारा शेड, पाणी व्यवस्था, माती कलेचे अद्ययावत प्रशिक्षण, मातीकला वस्तूंची विक्री व्यवस्था आदी उपक्रम राबविले तर कुंभार समाज टिकेल; अन्यथा कुंभारकला इतिहासजमा होईल
- भीमराव कुंभार, रानमसले, ता. उत्तर सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Patwardhan : अभिनेत्री भाग्यश्रीने आरती केली, विजयसिंहराजेंचा लेकीसोबतचा वाद पुन्हा उफाळला; राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये काय घडलं?

Pune News: महसूल विभागात खळबळ! जमिनींवर परस्पर कुळ लावल्याच्या तक्रारी; राज्यभरातील मंजूर प्रकरणांची तपासणी, महसूलमंत्र्यांनी काय दिले आदेश?

Shirdi Temple: साई चरणी १९ लाखांची सोन्याची छत्री, १ कोटी २० लाखांचा चांदीचा नंदी; गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांकडून अर्पण

Latest Marathi News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गणपती आगमन सोहळा मिरवणुकीला गालबोट, दोघांचा अपघाती मृत्यू

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT