attack on one young person in belgaum at night he injured 
पश्चिम महाराष्ट्र

चित्तथरारक! रात्रीच्यावेळी केला बाळुच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार ; सुदैवाने वाचला

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : अज्ञात हल्लेखोरांनी गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन पिरनवाडीतील एका तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी (ता.२८) रात्री ११.३० च्या सुमारास मच्छेतील केएसआरपी बटालियननजीक ही घटना घडली. बाळू निंगाप्पा शहापूरकर (वय २८, पिरनवाडी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मच्छेतील केएसआरपी बटालियननजीक रात्री ११.३० च्या सुमारास अज्ञातांनी बाळूच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. संबधीत तरुणावर हा प्राणघातक हल्ला नेमका कशासाठी आणि कुणी केला याचे कारण समजू शकले नाही. घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे. पोलिस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्‍वर पुढील तपास करीत आहेत.

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये महाविकास आघाडीची 'बिघाडी'! एकाच प्रभागात ४-४ अधिकृत उमेदवार; गोंधळ चव्हाट्यावर

मी चुकले! या विषयावर बोलण्याचा मला अधिकार नाहीये... जितेंद्र जोशीच्या पत्नीने मागितली माफी; कारण...

Retirement Travel Destination: निवृत्तीनंतर आनंदी आयुष्य जगायचं? मग या देशांतली भटकंती ठरेल तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन

PMC Election 2025 : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीत 'एबी फॉर्म'वरून राडा! "उमेदवार अजित पवारांनीच ठरवले", ज्येष्ठ नेत्यांचा घरचा आहेर

New Year 2026: नव्या वर्षात राशीनुसार ‘या’ मंत्रांचा जप करा, नशिबाची चावी तुमच्याच हातात!

SCROLL FOR NEXT