पश्चिम महाराष्ट्र

Lockdown : अडीच हजार रिक्षाचालक अडचणीत; चालकांसह त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ

सचिन शिंदे

कऱ्हाड : कोरोनामुळे शासनाने पुकारलेल्या संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे शहरासह तालुक्‍यातील सुमारे दोन हजार 500 रिक्षांची चाके थांबली आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक रिक्षा कर्जावर घेतल्या आहेत. त्यामुळे त्या मालकांच्या संसाराचा गाडाही थांबला आहे. निम्मे रिक्षावर चालक आहेत. त्या दिवसाच्या भाड्याने दिल्या आहेत. त्यामुळे त्या रिक्षाचालकांवर तर उपासमारीचे वेळ आली आहे. देशावर संकट आल्याने रिक्षाचालक संसाराचाही विचार न करता त्यात प्रशासनासोबत उभा राहिले आहेत खरे, मात्र त्यांच्या रिक्षांसह संसाराचीही चाके थबकल्याने त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष नाही, अशी स्थिती आहे.
 
शहरासह तालुक्‍यात अडीच हजारांवर रिक्षा आहेत. पॅसेंजर, शेअर ए रिक्षाचाही त्यात समावेश आहे. दररोज विद्यानगर, मलकापूर, खोडशी, कार्वे अशा वेगवेगळ्या रस्त्यांवर रिक्षा धावत असतात. अडीच हजारपैकी 50 टक्के रिक्षा चालकांनी कर्ज काढून खरेदी केल्या आहेत. तितक्‍याच रिक्षा भाड्याने देऊन त्यावर रिक्षा चालकांचा उदरनिर्वाह चालतो आहे. मात्र, कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडाऊनचा कालवधी रिक्षाचालकांसाठी मरण यातना देणारा ठरतो आहे. 2500 रिक्षांचा चाके 22 मार्चपासून थबकली आहे. अत्यावश्‍यक सेवेत त्यांचा समावेश होत नसल्याने त्यांना बाहेर पडणेही मुश्‍कील झाले आहे. सुमारे 2500 कुटुंबांवर जणू आर्थिक संकट कोसळले आहे. कर्ज काढून व्यवसायात आलेल्या रिक्षा मालकांपुढे रिक्षाचे हप्ते फेडायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा बनला आहे.

रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही त्याबाबत शासनाकडे रिक्षा चालकांचा विचार करण्याची मागणी केली आहे. येथील रिक्षा संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. शहर व तालुक्‍यातील 2500 रिक्षा व्यवसायातील कुटुंबांवर अक्षरशः एकवेळचे जेवण कसे मिळवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या लॉकडाऊनला सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या रिक्षा चालकांवर दिवाळखोर होण्याची वेळ आली आहे. त्याचा कोणीच गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. एका रिक्षा चालकाच्या घरात सरासरी किमान सहा लोक राहतात. अशी रिक्षा व्यवसायातील व्यक्तींची संख्या 2500 आहे. त्या सगळ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. 2500 रिक्षा चालकांमध्ये बहुताशी रिक्षा चालकांकडे उदरनिर्वाहाचे दुसरे साधनही नाही. त्यामुळेही मोठी अडचण निर्माण झाली आहे. घरातील लोकांची भुकलेले चेहरे पाहून काही रिक्षा चालकांची घालमेल होताना दिसते आहे. 

रिक्षा चालकांसह मालकांची बिकट अवस्था आहे. कर्जाच्या रिक्षांचे हप्ते भरण्यास पैसे नाहीत. उदरनिर्वाह कसा चालवायचा, घरातील लोकांना खायला काय द्यायचे असे अनेक प्रश्न आ वासून समोर आहेत. एकाही रिक्षा व्यावसायिकाला कोणत्याच शासकीय सुविधांचा लाभ घेता येत नाही. भविष्याची काहीही तरतूद नसणारा रिक्षा व्यावसायिक लॉकडाऊनमध्ये देशोधडीला लागतो आहे. त्यामुळे शासनाने त्याचा विचार करून त्यांना रोख स्वरूपात काही मदत करता येते का, याचा गांभीर्याने विचार करावा. अन्यथा राज्यातील रिक्षाचालकांवर आत्महत्येची वेळ येणार आहे असे रिक्षा व्यावसायिक  मस्कूद बागवान यांनी नमूद केले.

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितचा पहिला बळी; कॅलिफाेर्नियावरुन आलेल्या व्यक्तीचा झाला मृत्यू

भय इथले संपत नाही; कऱ्हाडकरांना हवी सुरक्षिततेची हमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं अर्धशतक, मिचेलसोबत चेन्नईचा डाव सावरला

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT