Ayush department benefits three lakh patients in four years 
पश्चिम महाराष्ट्र

‘आयुष’ चा चार वर्षांत तीन लाख रुग्णांना लाभ

सकाळ वृत्तसंस्था

साताराः आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी याबरोबरच योगा अशा पारंपारिक उपचार पध्दतीकडे नागरिकांचा कल वाढत चालला असून, जिल्हा रुग्णालयातील आयुष विभागात गेल्या चार वर्षांत तीन लाख रुणांनी उपचार घेतले आहेत. केवळ केसपेपरच्या पैशामध्ये महागड्या उपचारांचा लाभ मिळाल्यामुळे रुग्णांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

औषध पुरवठ्याची गरज
पारंपारिक उपचार पध्दतीच्या सुविधेमुळे रुग्णांचा याकडे ओढा वाढत आहे. परंतु, औषधांची पुरेशी उपलब्धता नसल्यास त्यावर मर्यादा येतात. मागील काही दिवसांमध्ये ते अनुभवायला मिळाले आहे. त्यामुळे रुग्णांचे या उपचार पध्दतींचा लाभ घेण्याचे सातत्य टिकून राहण्यासाठी औषधांचा पुरेसा पुरवठा करण्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.

अॅलोपॅथीव्यतिरिक्त अन्य पारंपारिक उपचार रध्दतीचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी आघाडी शासनाच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये स्वतंत्र आयुष विभागांची निर्मीती करण्यात आली. या विभागामध्ये आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी व योगा या उपचारपध्दतींचा लाभ रुग्णाला उपलब्ध झाला. त्याप्रमाणे जिल्हा रुग्णालयातही या विभागाला सुरवात झाली. आयुर्वेदिक विभागात सांध्याचे आजार, त्वचा विकार, आम्लपित्त, कावीळ, मुतखडा, पांडु व्याधी, रक्त कमी असणे त्याचबरोबर वातरक्त या आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्याचबरोबर आवश्यक त्या रुग्णांवर उपचार करण्यात आले.

होमिओपॅथीमध्ये प्रामुख्याने श्वसन विकार, विविध प्रकारच्या अॅलर्जी, त्वचा विकार, मेद्याच्या गाठी यावर उपचार करण्यात येतात. युनानी विभीगामध्ये आयुर्वेदिक पध्दतीप्रमाणेच सांध्याचे आजार, वात, पित्त, मुतखडा, पाईल्स, केस गळणे, मधुमेह, रक्तदाब, झोपेचे आजार, गुडघेदुखी या आजारांवर चांगल्या पध्दताचे उपचार करतात. त्याचबरोबर पंचकर्माप्रमाणे या विभागातही मसाज व कपिंग थेरपीची सुविधा आहे. त्याचबरोबर योगा विभागाच्या माध्यमातूनही रुग्णांना विविध आजारांसाठी रुग्णांना आसने शिकवली जातात तसेच आहाराचेही मार्गदर्शन केले जाते. दर महिन्याच्या  दुसऱ्या व चौथ्या गुरूवारी जेष्ठ नागरिकांसाठी योगासनांची प्रात्यक्षिकेही घेतली जातात.

या विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णांना आपुलकीने योग्य उचार देण्याचे प्रयत्न केले. त्याचा अनेक रुग्णांना आजर पुर्णतः बरे होण्यास मदत झाली. त्यामुळे या विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. खाजगी रुग्णालयामध्ये या विभागांची उपचार पध्दती व औषधांचा खर्च सर्वमासामान्य नागरिकांना अनेकदा परवडत नाही. त्यामुळे या उपचारपध्दतींकडे नागरिकांचा ओढा अॅलोपॅथीच्या तुलनेत कमी असतो. मागच्या चार वर्षाच या सुविधांचा सुमारे तीन लाख रुग्णांनी लाभ घेतला आहे. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT