Babasaheb Ambedkar Arch Dispute esakal
पश्चिम महाराष्ट्र

डॉ. आंबेडकर कमान वाद : सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यांना बजावलेली नोटीस नियमानुसारच; सात दिवसांत बाजू मांडण्याचे आदेश

तक्रारीत असलेल्या मुद्यांनुसार ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांची तपासणीही करण्यात आली होती.

सकाळ डिजिटल टीम

ग्रामपंचायतीने पाडलेल्या कमानीबाबत काही त्रुटी आढळून आल्याचे स्पष्ट झाले होते.

सांगली : बेडग (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान (Babasaheb Ambedkar Arch Dispute) पाडल्याबद्दल सरपंच, सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांना बजावलेली नोटीस नियमानुसारच आहे. त्याबाबत सात दिवसांत खुलासा करून बाजू मांडावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या.

बेडगमधील डॉ. आंबेडकर यांचे नाव असलेली कमान पाडण्यात आल्यानंतर आंबेडकरी समाजाच्यावतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (Trupti Dhodmise) चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन अहवाल मागविला होता.

तक्रारीत असलेल्या मुद्यांनुसार ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांची तपासणीही करण्यात आली होती. यामध्ये ग्रामपंचायतीने पाडलेल्या कमानीबाबत काही त्रुटी आढळून आल्याचे स्पष्ट झाले होते.

चौकशी अहवालानुसार, अतिक्रमणमध्ये केलेली कारवाई ही ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ५२ (२अ) व ५३(१) नुसार सदोष असल्यामुळे संबंधित ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य, तत्कालिन व विद्यमान ग्रामविकास अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याची कारवाई जिल्हा परिषद प्रशासनाने केली.

याबाबत सात दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, जिल्हा परिषदेने बजावलेल्या नोटिसा अन्यायकारक असल्याचा आरोप केला जात आहे. यावर नोटिसा नियमानुसारच आहेत. त्याबद्दल खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. जो काही असेल तो खुलासा करावा, अशा सूचना धोडमिसे यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT