पश्चिम महाराष्ट्र

...अन्‌ दीड वर्षाचा जयदीप आला चाकाखाली! 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : रिक्षाच्या धडकेने आईच्या कडेवर बसलेला दीड वर्षाचा जयदीप खाली पडला... भरधाव चारचाकी वाहनाच्या चाकाखाली सापडून जयदीपचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर देगाव परिसरातील पोलिस चौकीजवळ घडली. 

हेही वाचा : ओएलएक्‍सवर बाईकची जाहिरात! वाचा कसा फसला तरुण..

जयदीप रतन गायकवाड (वय 18 महिने, रा. भीमनगर, देगाव, सोलापूर) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास जयदीपची आई चैताली या रस्ता ओलांडत होत्या. बसवेश्‍वर तांड्याकडून आलेल्या भरधाव रिक्षाने चैताली यांना जोराची धडक दिली. या घटनेत चैताली यांच्या कडेवर बसलेला जयदीप खाली पडला. त्याच दरम्यान भरधाव चारचाकी वाहन तेथून जात होते. त्या चारचाकी वाहनाच्या खाली सापडून जयदीप गंभीर जखमी झाला. 

हेही वाचा : शिकारी पक्षी पहायचेत... चला, मग 'इथे' भेट द्या!

या अपघातानंतर जखमी चैताली यांना व जयदीपला नातेवाईक सिद्राम हलकवडे यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच जयदीपचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलिस चौकीत झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सलगर वस्ती पोलिसात सुरु होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Nepal Dispute: भारताचं महत्त्व नेपाळला उमगलं! तणावानंतर आता मैत्रीचा हात; बालेन शाहांनी वाढवला राजनैतिक संवाद

Google मध्ये पुन्हा मोठी कपात! अनेक कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; टेक इंडस्ट्रीत अस्थिरता कायम

IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध कशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन? कधी आणि कुठे होणार सामना, जाणून घ्या

Palghar News: पालघरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू

'लग्नानंतर होईलच प्रेम'ची पार्टी अन् 'झिंगाट'वर थिरकली मृणाल दुसानिस; जबरदस्त डान्स पाहून चाहते म्हणाले- अरे ही तर...

SCROLL FOR NEXT