Anti-reservation movement Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Bangalore : शिमोगा, बागलकोटला आरक्षणविरोधी आंदोलन

जाळपोळ, रस्तारोकोच्या घटना; वाहतूक विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : अनुसूचित जातींमधील अंतर्गत आरक्षणाबाबत न्यायमूर्ती ए. जे. सदाशिव आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्राला शिफारस करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात बंजारा समाजाचे आंदोलन आजच्या दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले.

आता हे आंदोलन शिमोगा आणि बागलकोट जिल्ह्यात पसरले आहे. शिमोगा तालुक्यातील कुंचेनहळ्ळीत जाळपोळ झाल्याची घटना घडली. बागलकोट येथील अनेक तांडांमध्ये बंजारा समाजाचा संताप उसळला आहे.

मंगळवारी कुंचेनहळ्ळी येथे बंजारा समाजाने रास्ता रोको केल्याने शिमोगा ते शिकारीपूर दरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली. शिवमोगा ते सावलंगा जोडणाऱ्या रस्त्यावर वाहने अडकून पडली. आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

बागलकोट जिल्ह्यात पडसाद

बंजारा समाजाने आज बागलकोट जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने करून आपला संताप व्यक्त केला. बिळगी तालुक्यातील सुनागा तांडा, बागलकोट तालुक्यातील मुचखंडी तांडा, हुनगुंद तालुक्यातील अमीनगड तांडा, कामतगी तांडा, अचनूर तांडा, नीलानगर तांडा, लवलेश्‍वर तांडा, जावळेश्‍वर तांडा, शिरगुप्पी तांडा आणि इतर ठिकाणी उग्र निदर्शने झाली.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई समाजातील लोकांशी चर्चा करून आरक्षणाचे प्रश्न सोडविण्यास तयार आहेत. त्यामुळे त्यांनी कायदा हातात घेऊ नये, असे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी शिकारीपूर येथे सांगितले. सर्व समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने एक पाऊल उचलले आहे, असेही ते म्हणाले. गृहमंत्री ज्ञानेंद्र यांनी खासदार बी. वाय. राघवेंद्र, जिल्हा पोलिस प्रमुख जी. के. मिथुनकुमार यांच्यासोबत बैठक घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांनी 'सुपर डान्सर चॅप्टर ५' मध्ये आदितीला दिला खास पाठिंबा

SCROLL FOR NEXT