पश्चिम महाराष्ट्र

नोटबंदीच्या संकाटनंतरही बँकेची वाटचाल सुरळीत

हुकूम मुलाणी

मंगळवेढा : गतवर्षीच्या कालावधीमध्ये नोटाबंदीचे सावट आल्याने अर्थव्यवस्थेचा विकास दर घटल्याने त्याचे परिणाम सर्व बँकींग क्षेत्रावर व ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झाले. सद्यस्थितीत बँक क्षेत्राला नवनवीन अव्हानांना सामोरे जात असतानाही रतनचंद शहा बँकेची वाटचाल ही सभासदाच्या विश्‍वासावर काटेकरपणे असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष राहूल शहा यांनी व्यक्त केले.

रतनचंद शहा बँकेच्या 56 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. प्रारंभी बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व. रतनचंद शहा व बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाष शहा यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी उपाध्यक्ष रामचंद्र जगताप, शिवदास चिंचकर, मुजझर काझी, महादेव माळी, बजरंग ताड, विजयकुमार शहा, उत्तम खांडेकर, अ‍ॅड. रमेश जोशी, लक्ष्मण नागणे, अभय हजारे, संतोष बुरकुल, छबुबाई दत्तु, बबिता गोवे, प्रतिभा खडतरे व तज्ञ संचालक अ‍ॅड. विश्वास देशमुख, निलेश मर्दा, सल्लगार अरविंद नाझरकर मनोपंत धोंगडे, किसन गवळी, बसवराज पाटील, पी.बी. पाटील, भुजंगराव पाटील, दिलीप जाधव, अशोक पवार, विठ्ठल शिंदे, भिमराव मोरे, अविनाश शिंदे, औदुंबर वाडदेकर यांच्यासह आदी क्षेत्रातील मान्यवर व सभसद मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना अध्यक्ष राहूल शहा म्हणाले की बँकेच्या 11 शाखा 14313 सभासदांच्या विश्वासावर कार्यरत असून बँकने सभासदांचा विश्‍वास जो मिळवला आहे तो आजही आर्थिक दृष्टया अबाधित आहे. त्या विश्वासास तडा जाऊ देणार नसल्याचे सांगून सध्या बँकेने एकरक्कमी परतफेड योजना, कोअर बँकींग सॅल्युशन, एसएमएस सुविधा, मिस कॉल अर्लट सुविधा, आरटीजीएस, ईनएफटी सुविधा, पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा बिमा योजना आदी सुविधा खातेदारांना दिल्या असून बँकेचा नेट एनपीए व ग्रॉस एनपीए हे सातत्याने कमी ठेवण्यासाठी कर्ज देतानाच या नियमांचे पालन करावे लागत आहे. सभासदांनी याबाबत नाराजी असली तरीही बँकेच्या दृष्टीने 2019-20 या कालावधीत नेट एनपीए 3% दर ग्रॉस एनपीए 7% ठेवण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. 

यावेळी प्रज्ञा कोंडुभैरी, भुषण इंगवले, प्रदीप कुलकर्णी, रोहिणी राऊत या इ. 10 व 12 वी च्या विदयार्थ्यांचा यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या सर्वसाधारण सभेसाठी दत्तात्रय शिर्के, बसवराज सलगरकर, संदीप पुळुजकर, दिलीप माळी, चंद्रकांत कोंडुभैरी, विकास भगरे, लखन दिवसे, अंबादास बेंद्रे, राजेंद्र कट्टे, हरिदास राजगुरु, दिपक तटपटे, शंकर गायकवाड, विजय नरळे, संजय नलावडे, संजय ब्रुद्रुक, सुनिल कवठेकर, दादासाहेब लुबाळ, महेंद्र शहा यांच्यासह सर्व कर्मचाय्रानी परिश्रम घेतले. प्रस्ताविक सरव्यवस्थापक हेमंत गरवारे तर आभार संचालक अभय हजारे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT