0Maha_Pariksha. 
पश्चिम महाराष्ट्र

हेही माहिती असू द्या....महापरीक्षा पोर्टलचे लेखापरीक्षण सुरु

तात्या लांडगे
सोलापूर : महापरीक्षा सेलच्या महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून 2017-18 पासून घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये घोळ झाल्याच्या तक्रारी राज्यभरातील विद्यार्थ्यांनी केल्या. त्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार महापरीक्षा पोर्टलसंदर्भातील तक्रारीचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी प्राईट वर्कर सुपर हाऊस (पीडब्ल्यूसी) या त्रयस्थ संस्थेची नियुक्‍ती करण्यात आल्याची माहिती महापरीक्षा सेलने दिली. आता या संस्थेच्या अहवालानंतर या पोर्टलचे भवितव्य ठरणार आहे.


हेही वाचाच...अरेच्चा...घरफोडीसाठी जावई यायचा सासरवाडीला


राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील रिक्‍त पदांची भरती महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. महापरीक्षा सेलचे राज्यभरात 150 सेंटर असून राज्यभरात एक हजार 600 कर्मचाऱ्यांचे जाळे आहे. महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत 13 हून अधिक परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या आहेत. तत्कालीन राज्य सरकारने जाहीर केलेली 70 हजार पदांच्या मेगाभरतीचेही नियोजन महापरीक्षा सेलने केले होते. पशुसंवर्धन विभागातील रिक्‍त पदांसाठी अर्जही मागविण्यात आले. तत्पूर्वी, कोल्हापूर, पुणे, सोलापूरसह राज्यभरातील सुमारे 70 हजार विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टलवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. त्याची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनीही घेतली आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पोर्टल बंद करण्याचे पत्र दिले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी पोर्टलद्वारे राबविण्यात आलेल्या परीक्षांमधील तांत्रिक व परीक्षा प्रक्रियेतील घोळाचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला. तोवर मेगाभरतीला स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, अजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वारंवार बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.


हेही वाचाच...नियोजन समित्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सत्तेचा वाटा


ठळक बाबी...
  • 'पीडब्ल्यूसी' संस्थेतर्फे महापरीक्षा पोर्टलचे ऑडिट सुरु
  • तांत्रिक अडचणी अन्‌ परीक्षा प्रक्रियेतील घोळाचे होणार लेखापरीक्षण
  • जानेवारीअखेर महापरीक्षा पोर्टलचा अहवाल द्या : त्रयस्थ संस्थेला निर्देश
  • राज्यभरातील सुमारे 70 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी केल्या तक्रारी
  • त्रयस्थ संस्थेचा अहवाल पूर्ण होईपर्यंत मेगाभरती राहणार बंदच


हेही वाचाच...बाळासाहेब ठाकरे कृषी महाविद्यालय स्थापण्यास मान्यता द्या


अमेरिकन संस्थेतर्फे लेखापरीक्षण
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार प्राईट वर्कर सुपर हाऊस या अमेरिकन संस्थेतर्फे महापरीक्षा पोर्टलचे ऑडिट केले जात आहे. मोठमोठ्या आयटी कंपन्यांचे ऑडिट या संस्थेतर्फे केले जाते. सहा-सात आठवड्यात ऑडिट पूर्ण होईल. त्याचा अहवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठविला जाणार आहे.
- अजित पाटील, कार्यकारी संचालक, महापरीक्षा सेल, मुंबई
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahalaxmi Express Robbery : महालक्ष्मी एक्स्प्रेसवर मध्यरात्री दरोडा; ट्रेन १५ मिनिटे रोखली, महिला प्रवाशांचे दागिने लुटून चोरटे पसार

प्रदर्शनाआधीच शाहरुखच्या 'किंग'ची कोट्यवधींची कमाई, 175 कोटींचा विक्रमी सौदा

Khadakwasla Dam Water Storage : खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस; जाणून घ्या कोणत्या धरणात किती पाणी, पुण्याच्या पाणीपुरवठ्यावर टांगती तलवार?

CNG Price: सीएनजी प्रतिकिलो ९० रुपयांवर! रिक्षा-टॅक्सीचालकांना फटका; दोन महिन्यांत दुसरी दरवाढ

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेसाठी सोसायटी गटात प्रतिष्ठेच्या लढती

SCROLL FOR NEXT