Belgaum to Dharwad railway sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्गाबाबत पुनर्विचार करावा!

सुपीक जमिनीतून मार्ग करण्यास शेतकऱ्यांचा विरोध

मिलिंद देसाई

बेळगाव : हलगा मच्छे बायपास प्रमाणेच बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्ग(Belgaum to Dharwad railway) देखील सुपीक जमिनीतून करण्यात येणार आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी आपली जमीन वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 80 टक्के सुपीक जमिनीतून(Arable land) रस्ता करून शेतकऱ्यांना देशोधडीला न लावता रेल्वे मार्गाबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे.

बेळगाव ते धारवाड रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले असून या योजनेसाठी अनुदान ही मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भूसंपादनाचे काम पूर्ण करून कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र या रेल्वे मार्गातील 80 टक्के जमीन ही सुपीक असून दुबार व तिबार पीके देणारी आहे. त्यामुळे सुपीक जमिनीतून मार्ग होऊ नये. या करिता शेतकऱ्यांनी स्वखर्चाने खाजगी सर्वेक्षण करून घेत नापिक जमिनीतून कशाप्रकारे रस्ता करता येईल त्याचा आराखडा रेल्वे खात्याला दिला आहे. तसेच सुरुवातीला सांबरा, संपगाव, कित्तुर ते धारवाड तसेच वडगाव, येळ्ळूर या भागातूनही महामार्ग करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र शेवटी बेळगाव, देसुर, के के कोप्प, कित्तुर ते धारवाड या मार्गाला पसंती देत लवकरच भूसंपादन केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

विविध भागातून रस्ते करण्यासाठी सुपीक जमिनीचे भूसंपादन करण्यात आले. तर शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसेल याचा विचार संबंधित खात्यानी करणे गरजेचे असल्याचे मत शेतकर्‍यांतून व्यक्त होत आहे. तसेच बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्गाबाबत पुन्हा एकदा विचार करावा अशी मागणी होऊ लागली आहे.

बेळगाव ते धारवाड असा होणार मार्ग

  • बेळगाव, देसुर, के के कोप्प, कित्तुर, धारवाड

  • रेल्वे मार्गाची ऐकून लांबी 73.2 किलो मीटर

  • मार्गावर एकूण 7 थांबे

  • मार्गावर ऐकून 140 पूल उभारण्यात येणार

  • 335 हेक्टर जमिनीचे भु संपादन

  • रेल्वे मार्ग निर्माण करण्यासाठी 927 कोटी रुपयांचा निधी

बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्गामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून रेल्वे मार्ग होणाऱ्या भागातील जमीन पूर्णपणे सुपीक आहे. याचा विचार करून सुपीक जमिनीतून महामार्ग न करता इतर मार्गाचा विचार केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान टळेल याचा विचार रेल्वे खात्याने करावा.

-गोपाळ पाटील, म ए समिती पदाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja Visarjan 2026 : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही होणार विलंब? गिरगाव चौपाटीवरील 'त्या' नैसर्गिक कारणामुळे वाढली चिंता; प्रशासनासमोर मोठं आव्हान

‘आईला सोडून कसा जाऊ? आधी तिला बाहेर काढतो’... शेवटपर्यंत झुंजला, अखेर बस आगीत माय-लेकाचा मृत्यू; अंगठीवरून पटली ओळख

‘तुम्हाला काय प्रॉब्लेम?’ सततच्या चर्चांवर गोविंदांचा सवाल; म्हणाला...‘माझ्या खासगी आयुष्याचा तमाशा करू नका’

Latest Marathi News Live Update : मुंबईत विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना; प्रभादेवीत भरधाव कार थेट गर्दीत घुसली, चार जणांना दुखापत

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

SCROLL FOR NEXT