पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर : राष्ट्रवादी, स्वाभिमानीला मोठा धक्का, महिला जिल्हाध्यक्षा, संघटनेचे नेते भाजपमध्ये

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या जिल्हाध्यक्ष संगीता खाडे यांनी आज शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून कोल्हापूरमधून उत्तर मतदारसंघामधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले दौलत देसाई हेही भाजपच्या वाटेवर आहेत. रविवारी त्यांचा भाजपमध्ये प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.

पालकमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचा बूथ लेवल कार्यकर्ता मेळावा झाला. त्यात काटे व सौ. खाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या दोघांचे मंत्री पाटील यांनी भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शाैमिक महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव  हे उपस्थित होते. 

भगवान काटे हे दीर्घकाळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांचे जिल्ह्यातील बिनीचे शिलेदार आहेत. त्यांचा भाजप प्रवेश शेतकरी संघटनेला मोठा धक्का आहे. संगीता खाडे या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या होत्या. तसेच राष्ट्रवादीच्या महिला शाखेच्या जिल्हाध्यक्ष होत्या. त्यांच्या घरातच राष्ट्रवादीचे कार्यालय होते. अलीकडेच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. तसेच आपल्या घरातून पक्षाचे कार्यालय हलवावे, अशी विनंती केली होती.

दौलत जयकुमार देसाई हे शिक्षणमहर्षी कै. एम. आर. देसाई यांचे नातू होत. त्यांनी कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली होती. परंतू येथून काँग्रेसने उद्योगपती चंद्रकांत जाधव यांना ऐनवेळी पक्षाची उमेदवारी दिली. त्यामुळे ते नाराज झाले होते. ते रविवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. यासाठी स्वतंत्र कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, २० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; पुर्णेकर समर्थकांच्या आंदोलनाचा फटका

LPG Gas Price Today: दिवाळीपूर्वी गॅस सिलिंडर महागला की स्वस्त? मुंबई-पुणे-नागपूरसह महाराष्ट्रातील शहरांचे दर पाहा

Karnataka MLC Election Results 2026 : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा सुफडा साफ! NDA ची मुसंडी; चारही जागांवर दणदणीत विजय, भोपळा मिळाल्याने सरकार हलले

Marathi News Live Updates : नालासोपारा पश्चिमेत वृक्ष प्राधिकरणाच्या वाहनाला अचानक आग, वाहनाचे मोठे नुकसान; उपायुक्तांच्या निष्काळजीपणाचा आरोप

Russia-Ukraine Ceasefire: रशिया अन् युक्रेन यांच्यात युद्धविराम सुरू... डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीची महत्त्वाची भूमिका

SCROLL FOR NEXT