Sharad Pawar
Sharad Pawar 
पश्चिम महाराष्ट्र

शरद पवारांचे नाव घेतल्यास ते दोषी असतील का? 

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अप्पाराव कोरे यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जागा हडप करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप मंगळवारी केला. 33 पानांच्या पुराव्यानिशी कोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, या आरोपानंतर सहकारमंत्री देशमुख म्हणाले, कोणीही उठेल आणि शरद पवार यांच्यावर आरोप करेल, मग त्यात त्यांना दोषीच धरायचे का. 

सोलापुरातील शासनाच्या पाच एकर जागेवर गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याची मागणी वराह व्यावसायिक संस्थेने काही वर्षांपूर्वी केला. मात्र, सहकारमंत्री देशमुख यांनी 19 एप्रिल 2017 मध्ये महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वेगळाचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामध्ये लोकमंगल बॅंकेच्या सभासदांसह बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना घरे द्यावीत, असे नमूद केल्याचेही कोरे म्हणाले. तरी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. दरम्यान, कोरे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना सहकारमंत्री म्हणाले की, लोकशाहीत कोणीही कोणावर आरोप करु शकतो. परंतु, कोरे यांनी पुराव्यानिशी बोलावे. शरद पवार यांच्यावर उद्या कोणीही काहीही आरोप करेल, मग त्यामध्ये त्यांना दोषी धरायचे का, असे उत्तर सहकारमंत्र्यांनी दिले. आरोप करणाऱ्यांनी आपण नेमक्‍या किती आणि कोणत्या जागा हडप केल्या अथवा करण्याचा प्रयत्न सुरु आहे, याची पुराव्यानिशी माहिती द्यावी, असे आव्हानही त्यांनी दिले. 

सहकारमंत्री पुन्हा वादाच्या भोवऱ्यात 
जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय अप्पाराव कोरे यांनी काही महिन्यांपूर्वी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या संस्थेने अवैधरित्या दूध भुकटी प्रकल्प लाटल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सहकारमंत्री देशमुख यांच्या मुलांसह अन्य व्यक्‍तींवर गुन्हे दाखल करण्यात आले. आता या नव्या आरोपांमुळे सहकारमंत्री पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT