Karad Nagarpalika
Karad Nagarpalika 
पश्चिम महाराष्ट्र

स्थायी समितीतून भाजप हद्दपार 

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापती व त्यांच्या सदस्य निवडीवर जनशक्ती विकास आघाडीचेच वर्चस्व राहिले. सर्वच समित्यांच्या सभापतिपदांवर जनशक्तीच्या नगरसवेकांची वर्णी लागली. 


स्थायी समितीसाठी तीन सदस्य निवडून द्यायचे होते. त्यात आघाड्यांच्या संख्याबळावर भाजपऐवजी लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांची वर्णी लागली. त्यामुळे भाजपचे सदस्य निवड प्रक्रियेद्वारे स्थायीतून हद्दपार झाले. या समितीवर जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव व माजी नगराध्यक्षा श्रीमती शारदा जाधव यांची नियुक्ती जनशक्तीकडून झाली. 

महत्त्वाच्या बांधकामला किरण पाटील, आरोग्यला महेश कांबळे, तर पाणीपुरवठ्यावर श्रीमती आशाताई मुळे अशा नवख्या नगरसवेकांवर सभापतिपदाची जबाबदारी देण्यात आली. नियोजन समितीवर विजय वाटेगावकर आणि महिला समितीवर स्मिता हुलवान यांची सभापती म्हणून फेरनिवड झाली. जिल्हा प्रशासन अधिकारी रवी पाटील यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहिले. सहा विषय समित्यांच्या सभापती, सदस्य व स्थायी समितीच्या सदस्य पदसाठी नगरपालिकेत विशेष सभा झाली. त्यात निवडी जाहीर झाल्या. सकाळी दहा ते बारा यावेळेत पीठासन अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर दुपारी बारा वाजता प्रत्यक्षात निवडींना सुरवात झाली. विशेष सभेत पीठासन अधिकारी पवार यांच्याकडे विषय समित्यांसाठी नामनिर्देशन दाखल करण्यात आले. जनशक्तीकडून पाच, भाजपकडून दोन, तर लोकशाही आघाडीकडून प्रत्येक एक सदस्य प्रत्येक समितीत देण्यात आला. आठ सदस्यांच्या समित्यांची घोषणा झाली. त्यानंतर प्रत्येक समितीच्या सभापतिपदासाठी नामनिर्देशन देण्यात आले. त्यासाठी पीठासन अधिकारी यांनी पंधरा मिनिटांचा कालावधी दिला. 

विषय समित्यांच्या सभापतिपदावर जनशक्तीच्याच नगरसवेकांची वर्णी लागली. प्रत्येक समितीत जनशक्तीचे पाच सदस्य होते. त्यांचे बहुमत असल्याने जनशक्ती आघाडी सभापतिपदासाठी ज्यांचे नाव सुचवेल त्यांना भाजप व लोकशाही आघाडीच्या नगरसवेकांनी संमती दिली. त्यानुसार नियोजनला विजय वाटेगावकर, तर महिला बालकल्याणसाठी स्मिता हुलवान यांची फेरनिवड झाली. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे स्थायी समितीच्या तर उपाध्यक्ष जयवंत पाटील शिक्षण समितीचे पदसिद्ध सभापती आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी झालेल्या आघाड्यांचे बलाबल निश्‍चित धरून स्थायी समितीच्या सदस्यपदाची निवड केली जाईल, असे जाहीर करून श्री. पवार यांनी पालिकेत जनशक्तीचे सोळा, लोकशाहीचे सहा, तर भाजपचे पाच सदस्य असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार सध्याच्या नगरसेवकांची संख्या तौलनात्मकदृष्ट्या त्या संख्येशी भागून स्थायी समितीच्या सदस्यांची निवड होईल, असे श्री. पवार यांनी स्पष्ट केले. त्याला श्री. पावसकर, श्री. पटवेकर यांनी जोरदार आक्षेप घेत नियमाबाह्य व बेकायदेशीर निकाल देत आहात, असे स्पष्टपणे मांडले. 

त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे भाजपच्या पाच सदस्यांची नोंदणी आहे. तीच ग्राह्य धरण्यात येईल. त्यावर आपल्याला हरकत घ्यायची असेल, तर विभागीय आयुक्तांकडे दाद मागू शकता, असे श्री. पवार यांनी या वेळी स्पष्ट करून स्थायीच्या सदस्यांची निवड जाहीर केली. त्यात जनशक्तीतर्फे गटनेते यादव, श्रीमती शारदा जाधव, तर संख्येच्या बळावर लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील यांची स्थायीवर वर्णी लागली. 

राजेंद्र मानेंची नाराजी

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक व कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अप्पा ऊर्फ राजेंद्र माने जनशक्ती आघाडीत आहेत. त्यांना एखादी समिती मिळेल, असा अनेक राजकीय लोकांचा अंदाज होता. मात्र, त्यांची वर्णी लागली नाही. त्यामुळे विशेष सभा सुरू असतानाच श्री. माने सभात्याग करून निघून गेले. गटनेते राजेंद्र यादव यांनी श्री. माने यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची नाराजी दूर होऊ शकली नाही. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व मानत असल्यानेच डावलले आहे, अशी प्रतिक्रिया श्री. माने यांनी पत्रकारांना दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT