पश्चिम महाराष्ट्र

भाजपचे मंगळवारी आंदोलन; सरकारला धरणार धारेवर

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे. सरकारच्या बेफीरीमुळे राज्यात महिलावरील आत्याचार वाढले आहेत. त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्यावतीने मंगळवारी (ता. 25) जिल्हाधिकारी कार्यालय, कऱ्हाड, कोरेगाव, खंडाळे येथील तहसील कार्यालय, वाई येथे पोलिस ठाण्यासमोर तर महाबळेश्वर पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे चिटणीस अतुल भोसले व जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी आज (शनिवार) येथे पत्रकार परिषदेत दिली.

आंदोलनाची माहिती देण्यासाठी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुकुंद चरेगावकर, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, प्रमोद शिंदे, कऱ्हाड दक्षिणचे धनाजी पाटील, संजय पवार, महिला मोर्चाच्या डाॅ. शुभांगी गावडे, प्रशांत कुलकर्णी, सिमा घार्गे, स्वाती पिसाळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपचा विश्वासघात करुन कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सरकार स्थापन करताना सेना प्रमुख व सध्याचे मुख्यमंत्री, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन अवकाळीग्रस्तांना हेक्टरी 25 हजार आणि फळबागांसाठी 50 हजार मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना आश्वासनांचा विसर पडला आहे. नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही. महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांची फसवणुक करणारी आहे. सरकारने फक्त अल्पमुदतीची पीककर्जे माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार नाही. सरकारने तुर खरेदीचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांकडुन होणाऱ्या खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा भाजपतर्फे आम्ही निषेध करत आहोत.

सविस्तर वाचा : मला शुभेच्छाही नकाेत : उदयनराजे भाेसले

महिनाभरात महिलांवरील आत्याचार वाढले आहेत. महिलांवर आत्याचार करणाऱ्यांवर धाक बसवण्याएेवजी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात व्यस्त आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. हिंगणघाड येथील प्रकरण, अॅसीडहल्ला, अल्पवयीन मुलींवर आत्याचार, बलात्कार, महिलांना जाळुन टाकणे अशा घटना वाढु लागल्या आहेत. त्यामुळे तरुणी, महिलांत भितीचे वातावरण आहे. त्यामुळे सरकारच्या निधेधार्थ मंगळवारी भाजपच्यावतीने धरणे आमदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती देवुन श्री. भोसले व श्री. पावसकर यांनी सर्वानी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

वाचा : साताऱ्याचे 'हे' नेते चालले पुन्हा राष्ट्रवादीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

CIDCO: आनंदाची बातमी! सिडकोने गृहकर्ज मर्यादा वाढवली; आता घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार, व्याजदर अन् नवीन लिमिट किती?

Gudi Padwa 2026: भोपाळमध्ये 'मराठी' थाट! मुख्यमंत्र्यांनी घातली पेशवाई पगडी; ढोल-ताशांच्या गजरात गुढी उभारून केले नववर्षाचे स्वागत

SCROLL FOR NEXT