crime news of satara 
पश्चिम महाराष्ट्र

काही कळायच्या आत त्याने आईच्या डोक्‍यात मारली कुऱ्हाड

सकाळ वृत्तसेवा

मायणी (जि. सातारा) : तू माझं लग्न का करत नाहीस, असा जाब विचारत मोराळे (ता. खटाव) येथील मुलाने डोक्‍यात कुऱ्हाडीचे घाव घालून आईच्या निर्घृण खून केला. पहाटे दीडच्या सुमारास ही घटना घडली. कांताबाई शहाजी शिंदे (वय 52) असे दुर्दैवी आईचे नाव असून, किरण (वय 29) याला पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा - नऊ दारू दुकाने, बिअर बारवर गंडांतर ; आता खाकीच्याच हातात भवितव्य

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मोराळेतील मधला मळा नावाच्या शिवारात शहाजी शिंदे हे त्यांची आई, पत्नी व मुलांसमवेत राहतात. किरण हा परराज्यात सोने-चांदी गलईचा व्यवसाय करतो. तो व्यसनी आहे. काही दिवसांपासून तो मोराळेतच राहात आहे. किरणच्या मामाच्या मुलाचे लग्न मायणीत होणार असल्याने लग्नात काही देणे घेण्याबाबत काल (ता. 12) रात्री चर्चा झाली. त्यानंतर सर्व जण झोपी गेले.

मामाच्या मुलाचे लग्न होणार पण आपले लग्न ठरत नाही, या विचाराने किरण अस्वस्थ होता. रात्री दीडच्या सुमारास शहाजी शिंदे हे लघुशंकेसाठी दरवाजाच्या दिशेने निघाले. तीच वेळ साधत अस्वस्थ किरणने संतापाने पेटून उठत डाव साधला. लघुशंकेला निघालेल्या वडिलांना काही कळण्याआधी त्याने पाठीमागून लाथ मारून घराबाहेर ढकलून दिले आणि आतून कडी लावून घराचा दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर झोपलेल्या आईच्या दिशेने त्याने आपला मोर्चा वळवला.

अवश्य वाचा -  सकाळच्या पाठपुराव्यामुळे एसटी महामंडळाला बदलावा लागला निर्णय

आधीच्या गोंधळाने जागी झालेल्या आईला तो तावातावाने बोलू लागला. "तू माझं लग्न का करत नाहीस? मला काम का सांगतेस' असा जाब विचारून तो वाद घालू लागला. वाद घालतच त्याने घरातील लाकूड फोडण्याची कुऱ्हाड हातात घेतली. काही कळायच्या आतच त्याने आईच्या डोक्‍यावर कुऱ्हाडीने घाव घातले. रक्ताच्या थारोळ्यात तडफडच त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

जरुर वाचा - ग्रामस्थांनो, कर भरा.. मच्छरदाणी मिळवा

वडील व शेजाऱ्यांनी घरात येण्याचा प्रयत्न केला. मात्र, आत आलात तर तुमचीही खांडोळी करेन, अशी धमकी त्याने दिली. कदाचित तो बाहेर येईल या भीतीने अखेर वडिलांनीच बाहेरून घराला कडी लावली. 

दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितास ताब्यात घेतले. पंचनामा करून कुऱ्हाड जप्त केली. कलेढोण येथील जिल्हा उपरुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद मायणी पोलिस दुरक्षेत्रात झाली असून, पोलिस उपनिरीक्षक शहाजी गोसावी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

Latest Marathi News Updates Live : वेरूळ घाटात टँकर पलटी होऊन दोन निष्पाप जीवांचा अंत

OBC Reservation: ''ओबीसींचं आरक्षणच संपलं..'', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत दिला जीव

Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

SCROLL FOR NEXT