Break the cage and rescue the leopard 
पश्चिम महाराष्ट्र

पिंजरा तोडून बिबट्याने ठोकली धूम, मग त्यांच्या पोटात भीतीचा गोळा

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर ः तालुक्‍यातील उक्कलगाव येथील धनवाट रस्त्यावरील उसात आज बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. दोन दिवसांपूर्वी खालच्या बाजूने पिंजरा तोडून व जमीन उकरून बिबट्याने धूम ठोकली. चांडेवाडी शिवारात लावलेल्या पिंजऱ्याला बिबट्याने हुलकावणी दिली. त्यामुळे या परिसरात अजून बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

दोन बछडे आढळले

उक्कलगाव येथील भारत व ईश्वर जगधने यांच्या शेतातील ऊस सकाळी कामगार तोडत होते. त्या वेळी त्यांना उसात बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. जगधने यांनी वन विभागाला माहिती दिली. कोपरगाव येथील वनक्षेत्रपाल संतोष जाधव यांच्यासह पथक घटनास्थळी आले. त्यांनी बछडे ताब्यात घेतले. एक-दोन महिन्यांचे हे बछडे असावेत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. 

ती परत आली पण...

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी उक्कलगाव येथील थोरात यांच्या चिकूच्या बागेत लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. मात्र, त्याने पिंजऱ्याची खालची कुजलेली बाजू तोडून व नंतर जमीन उकरून तेथून सुटका करून घेतली. चांडेवाडी शिवारात लावलेल्या पिंजऱ्याजवळ काल रात्री बिबट्या आला होता; मात्र तो पिंजऱ्यात गेलाच नाही. सकाळी पिंजऱ्याजवळ ठसे दिसल्याने हा प्रकार लक्षात आला. ग्रामस्थांनी वन कर्मचाऱ्यांना माहिती दिली. धनवाट परिसरातील शेतकरी अशोक थोरात यांच्या वस्तीवर बिबट्याने काल रात्री कुत्रे व रानबोक्‍याचा फडशा पडला. 

बछड्यांना ठेवले तेथे

बछड्यांची आई तेथे येईल, या उद्देशाने अधिकाऱ्यांनी जगधने यांच्या शेतात नवीन पिंजरा लावत त्यात बछड्यांना ठेवले आहे. गळनिंब, उक्कलगाव, चांडेवाडीसह ममदापूर, मांडवे, कडीत, फत्त्याबाद, कुरणपूर या प्रवरा नदीच्या पट्ट्यात महिन्यापासून बिबट्याचा वावर असल्याचे दिसत आहे. 

परिसरात आहेत बारा पिंजरे

उक्कलगाव येथे पिंजऱ्यातील बिबट्या पळून गेला. परिसरात एकूण 12 पिंजरे लावले आहेत. गळनिंब परिसरात सहा पिंजरे लावले असून, मांडवे, फत्त्याबाद शिवारातही पिंजरे लावले आहेत. वन अधिकारी, वनपाल, दक्षता पथकाचे अधिकारी, असे 16 कर्मचारी एक फेब्रुवारीपासून या परिसरात तळ ठोकून आहेत. 
- रमेश देवखिळे, सहायक वनसंरक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT